Jalna : ZPच्या गुरुजींची बदली प्रक्रिया सुरू Jalna Zilla Parishad Teacher Online Transfer Process | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher transfers

Jalna : ZPच्या गुरुजींची बदली प्रक्रिया सुरू

जालना : जिल्हा परिषद शिक्षक ऑनलाइन बदली प्रक्रिया सुरु आहे. शिक्षक बदली संदर्भात विहित प्रमाणपत्राबद्दल जर तक्रार असेल तर तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रियेत विस्थापित गटात ८४ शिक्षक आहेत. याबाबत अद्याप वरिष्ठ पातळीवरून नियोजन सूचना देण्यात आलेल्या नाहीत. शिक्षक बदली ऑनलाइन प्रक्रियेत प्रमाणपत्राबद्दल अद्याप तक्रार आलेली नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठवाड्यात सध्या जिल्हा परिषद शिक्षक ऑनलाइन बदली प्रक्रिया सुरु आहे. तर दुसरी बाजू पाहता बीड जिल्ह्यातील काही शिक्षकांनी चक्क बोगस प्रमाणपत्र जोडून लाभ घेतल्याचे उघड झाल्याने इतर जिल्ह्यात अशा प्रकारे चौकशी व्हावी,अशी विविध स्तरातून मागणी होत आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे कुठलीच तक्रार आली नसल्याचे अधिकारी सांगतात. तर शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता प्रशासनाने पडताळून पाहिली,असे शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे.

 • संवर्ग-एक (अपंग व इतर प्रकार)

 • फॉर्म भरलेले - ३६८

 • बदली झालेले -११४

 • बदलीची टक्केवारी -३०.९७

 • संवर्ग-दोन (पती-पत्नी)

 • फॉर्म भरलेले - ६७

 • बदली झालेले - ६२

 • बदलीची टक्केवारी -९२.५३

संवर्ग-तीन

 • फॉर्म भरलेले - निरंक

 • बदली झालेले - निरंक

 • बदलीची टक्केवारी - निरंक

 • (अवघड क्षेत्र नसल्याने स्थिती)

 • संवर्ग-चार ( पात्र)

 • फॉर्म भरलेले - ९९३

 • बदली झालेले -८९३

 • बदलीची टक्केवारी -८९.९२

 • संवर्ग चार : विस्थापित (द्वितीय फेरी)

 • फॉर्म भरलेले - ८४

 • बदली झालेले - प्रक्रिया सुरु

 • बदलीची टक्केवारी -प्रक्रिया सुरू

शिक्षक बदली प्रक्रियेत विशेष संवर्ग देण्यात आले आहे. त्याच संवर्गातील शिक्षकांनी माहिती भरली.

परंतु पदाचा लाभ घेण्यासाठी किंवा सोयीचे ठिकाण मिळावे यासाठी कदाचित खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.यामुळेच मूळ लाभ घेणारे,दिव्यांग गटातील बांधवांवर अन्यायच केल्यासारखे आहे. असे प्रकार पुढे येण्यासाठी प्रमाणपत्र पडताळणी झालीच पाहिजे.

— रघुनाथ वाघमारे,जिल्हा सचिव, राज्य शिक्षक समिती