जय हो! कुणाचा ते आज ठरणार 

जय हो! कुणाचा ते आज ठरणार 

जालना -जालना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता. 23) सकाळपासून होणार आहे. यानिमित्त जिल्हाभरात सध्या निकालाची उत्सुकता आहे. निवडणूक यंत्रणाही सज्ज झालेली आहे. 

जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत मतमोजणीस सुरवात होणार आहे. मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे. दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्‍यता आहे. निवडणूक निकालानंतर झेडपी आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता येईल याचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी, तर 112 गणांसाठी निवडणूक झाली. अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना हे राज्य व केंद्रात सत्तेत असतानाही वेगवेगळे लढले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी झाली होती. त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत झाली. तिन्ही पक्षांनी बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे; पंरतु प्रत्यक्षात मात्र मतदार नेमका कोणाच्या बाजूने कौल देतात हे स्पष्ट झाल्यानंतरच अध्यक्षपदासाठी उमेदवाराची निवड केली जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची प्रचार यंत्रणा मी व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी अतिशय आक्रमकपणे राबविली. जिल्हाभरात तीसपेक्षा अधिक ठिकाणी सभा घेऊन मतदारांमध्ये जागृती केली. त्यामुळे पक्ष स्वबळावर सत्तेत येईल, समजा काही जागा कमी पडल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे निर्णय घेतला जाईल. 
भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पंचवीस जागा मिळतील; तर मित्र पक्षाला 5 ते 8 जागा मिळतील. त्यामुळे आमच्या पक्षाचाच अध्यक्ष होईल. समजा काही कारणांस्तव जागा कमी पडल्या तर परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. यासाठी सर्व पर्याय खुले राहतील. 
निस्सार देशमुख,  जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

जिल्ह्यात भाजपला सर्वांत जास्त जागा मिळतील. अध्यक्षपद आमच्याच पक्षाचा राहील. राज्याप्रमाणे जिल्ह्यातही भाजपचाच पहिला क्रमांक राहणार आहे. निवडणुकीनंतर युतीबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. 
रामेश्‍वर भांदरगे, जिल्हाध्यक्ष, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com