प्रत्येक जिल्ह्यात 'हज हाऊस' बनविणार : जमाल सिद्दीकी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मे 2019

  • शहरात सुरु असलेल्या हज हाऊसच्या कामाची पाहणी
  • केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयास पाठविणार बजेट 

औरंगाबाद : राज्यातून हजला जाणाऱ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात. तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हज हाऊस बनविण्यात येणार आहे. यासह हज जिल्हानिहाय असलेल्या समित्याची स्थापना लवकरच केली जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी रविवारी (ता.5) पत्रकार परिषदेत दिली. 

हज समितीचे अध्यक्षपदी(राज्यमंत्रीपदाचा दर्जा) निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते जमाल सिद्दीकी औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शहरात सुरु असलेल्या हज हाऊसच्या कामाची पाहणी केली. यासह प्रत्येक ठिकाणाच्या हज समिती निवडीपुर्वी ते आढावा घेत आहे. जमाल सिद्दीकी म्हणाले, आम्हाला हजला जाणाऱ्यांच्या अडचणी सोडवायच्या आहेत. त्याच अनुषंगाने सर्वत्र दौरे करून लोकांच्या अडचणी समजून घेत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हज समितीसह हज हाऊस बनविणार आहे. यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या बजेट पाठविणार आहे. गेल्या वेळी हजसंदर्भात सरकारने बजेटची तरतुद केली होती. यंदाही तरतुद करणार असल्याचे मुख्यमंत्री सांगितले आहे. हजसाठी जहाजावरील प्रवास पुन्हा सुरु करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यंदा आम्हाला 2 हजार 378 हाजी मिळाले आहेत. यासह खाजगी टुर्ल अॅण्ड ट्रॅव्हर्ल्सतर्फे हजला जाणाऱ्यांची मोठी लुट होते. हे रोखण्याचे कामही आम्ही करणार आहे. या ट्रॅव्हर्ल्सचा कोटा कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. यासह हज यात्रेकरूना मिळणारे अनुदान वेळेत कसे मिळेल यांचाही काम करण्यात येत आहेत. यासह विमानाबाबतही तक्रारी आल्या आहेत. यामुळे हज यात्रेकरूंना कोणताही त्रास होऊ नयेत याच दुष्टीने विमान कंपन्यांनाही सूचना करण्यात येत आहेत. असेही जमाल सिद्दीकी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीचे अशासकीय सदस्य नबी पटेल उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jamal Siddiqui will make Haj House in every district