जनता कर्फ्यू : लातूरकरांच्या प्रतिसादाला सॅल्यूूट

हरी तुगावकर
रविवार, 22 मार्च 2020

शहरातील नेहमी गजबज असणाऱया रस्त्यावर रविवारी चिटपाखरूही नव्हते. खरी संचारबंदी लागल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळाले.

लातूर : कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २२) जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. याला लातूरकरांनी मोठा प्रतिसाद देत आम्ही सूजाण नागरीक असल्याचे दाखवून दिले आहे.

शहरातील नेहमी गजबज असणाऱया रस्त्यावर रविवारी चिटपाखरूही नव्हते. खरी संचारबंदी लागल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळाले.

लातूर शहरातील शिवाजी चौक, गांधी चौक, गंजगोलाई, नंदीस्टॉप, विवेकानंद चौक, रेणापूर नाका, मुख्य रस्ते नेहमी नागरीकांनी गजबजले असतात. पण आज या ठिकाणी स्मशान शांतता पहायला मिळाली. कोरोनाच्या विषाणुमुळे जग हादरून गेले आहे. 

चिंताजनक... राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ६४ वरून ७४ वर

महाराष्ट्रातही त्याचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय पातळीवर मोठ्या उपाय योजना केल्या जात आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. लातूरकरांनी याला मोठा प्रतिसाद दिला. मुख्य रस्त्यासोबतच गल्लीबोळातील रस्तेही निर्मनुष्य दिसत होते. रस्त्यावर मात्र ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त दिसून येत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janata Curfew In Latur To Fight Coronavirus India Maharashtra News