युवकांमध्ये ‘जाणता राजा’ स्वेटरची क्रेज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

माजलगावात मराठा क्रांती मोर्चाचे वारे, विक्रेत्यांनी हेरले मार्केट

माजलगाव - राज्यात सर्वत्र सकल मराठा समाजाचे क्रांती मोर्चे निघाले. त्यामुळे मराठा समाजात नवचैतन्य निर्माण झाले. हेच हेरून कापड व्यापाऱ्यांनी यंदा स्वेटर्सवर ‘शिवाजी महाराज’, ‘जाणता राजा’, ‘जगदंब’ असे शब्द मुद्रित केले आहेत. त्याला युवकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, या स्वेटर्सची मागणी वाढली आहे. 

मागील तीन वर्षांत यंदा सर्वाधिक थंडी पडली. रात्री आठ वाजेपासून ते सकाळी अकरा-बारापर्यंत थंडी जाणवत आहे. त्यामुळे ऊबदार कपड्यांचा वापर वाढला आहे. दरम्यान, यावर्षी स्वेटर्सच्या डिझाईनमध्ये मोठे बदल झाले आहेत.

सध्या जाणता राजा, जगदंब, शिवाजी महाराज मुद्रित असलेल्या स्वेटर्सची युवकांमध्ये क्रेझ आहे. एवढेच नाही तर ‘मी मराठी’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा शैलीदार स्वेटर्सने ग्राहकांना भुरळ घातली आहे. याद्वारे थंडीपासून संरक्षण तर होतच आहे. शिवाय समाजातील एकीसुद्धा आधोरेखित होत आहे. शहरातील आंबेडकर चौक, शिवाजी महाराज चौक, संभाजी चौक, अण्णा भाऊ साठे चौक, अहिल्याबाई होळकर चौक यासह विविध ठिकाणी या प्रकारचे स्वेटर्स उपलब्ध आहेत.   
 
मागील तीन वर्षांचा विचार केला तर यावर्षी उबदार कपड्यांची विक्री वाढली आहे. शिवाजी महाराजांशी निगडित असलेल्या स्वेटर्सची खास मागणी आहे. काही युवकांना तर तेच स्वेटर्स हवे आहेत.   
- सोनूसिंग, स्वेटर विक्रेता

Web Title: janata raja swaiter craze in youth