पाकिस्तानच्या गोळीबारात वैजापूरचा जवान हुतात्मा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

किरण थोरात हे लाडगावजवळील फकीराबाद येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आरती, आई-वडील आहेत. आज गुरुवारी त्यांचे पार्थिव फकीराबादला आणण्यात येणार आहे. तेथून त्यांच्या मूळगावी पार्थिव आणण्यात येणार आहे.

औरंगाबाद : जम्मू-काश्मीरमधील पुँच जिल्ह्यात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जवान किरण पोपटराव थोरात (वय 31) हे हुतात्मा झाले. 

किरण थोरात हे लाडगावजवळील फकीराबाद येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आरती, आई-वडील आहेत. आज गुरुवारी त्यांचे पार्थिव फकीराबादला आणण्यात येणार आहे. तेथून त्यांच्या मूळगावी पार्थिव आणण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानने कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात महाष्ट्रातील परभणीतील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे हुतात्मा झाले होते.

पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमारेषेवर गोळीबार करण्यात येत आहे. भारतीय जवानांकडूनही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात येते. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्येही वाढ झाली आहे.

Web Title: Jawan Kiran Thorat killed in Pakistan firing in Poonch