जवानाकडून पोलिसानेच घेतली लाच

Bribe
Bribe

औरंगाबाद - राज्य राखीव बलातील जवानाकडून वीस हजारांची लाच घेताना सातारा पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या सापळ्यात अडकला. पत्नीने केलेल्या तक्रारीचा अहवाल समादेशकांना न पाठवण्यासाठी फौजदाराने लाच घेतली. ही कारवाई सोमवारी (ता. १२) पोलिस ठाण्याच्या आवारात करण्यात आली.

नारायण केशव बऱ्हाटे (वय ५५) असे सहायक फौजदाराचे नाव आहे. ते सातारा पोलिस ठाण्यात रुजू आहेत. या प्रकरणात राज्य राखीव बलातील जवानाने तक्रार दिली. जवानाविरुद्ध त्यांच्या पत्नीने सातारा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीचा अहवाल राज्य राखीव बलातील जवानाचे वरिष्ठ असलेल्या समादेशकांना न पाठविण्यासाठी बऱ्हाटे यांनी पन्नास हजारांची मागणी जवानाकडे केली. याविरोधात जवानाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचेची पडताळणी केली. त्यावेळी तडजोडीअंती जवानाला वीस हजारांची बऱ्हाटे यांनी मागणी केली. पथकाने सापळा रचून बऱ्हाटे यांना ठाण्यासमोरील रॉयल टपरीजवळ पकडले. त्याच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक शंकर जिरगे यांच्या सूचनेनुसार उपअधीक्षक बाळा कुंभार, निरीक्षक गणेश धोक्रट, हवालदार गणेश पंडुरे, रवींद्र देशमुख, अश्‍वलिंग होनराव, सुनील पाटील, संदीप चिंचोले यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com