देशसेवा करणारा सहा बहिणींचा आधार हरपला

Rohit-Shingade
Rohit-Shingade

जळकोट - दरवर्षी दिवाळी सणाला भाऊ येणार म्हणून सहा बहिणी भावांना गोडधोड करण्याच्या तयारीत लागत होत्या. परंतु, यावर्षी दिवाळीत भाऊ-बहिणींची भेट होण्याऐवजी ताटातूट झाली. देशसेवा करताना बर्फात पडून भावाचा मृत्यू झाल्याची बातमी कानावर पडताच बहिणींनी टाहो फोडला. मिल्ट्रीत लान्स नायकपदी कार्यरत असलेले रोहित शिंगाडे यांचे मंगळवारी (ता. १३) निधन झाले. 

जळकोट शहरातील शिंगाडे कुंटुबातील रामराव आणि विलास शिंगाडे हे देशाची सेवा करून निवृत्त झाले आहेत. काकांच्या पावलावर पाऊस टाकत रोहित व भाऊ राहुल सैन्यात भरती झाले. रोहित सियाचीन येथे सेवेत होते. 

कर्तव्यावर असताना शनिवारी (ता. दहा) रोहित शिंगाडे बर्फावर पडून डोक्‍याला जबर मार लागल्याने जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सहा बहिणींची जबाबदारी रोहित यांच्यावर होती. हा आधारच हरपल्याने शिंगाडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. व्हॉलीबॉल खेळात रोहित यांना रस होता. मिल्ट्रीत भरती झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांनी खेळात सहभाग घेऊन आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्यांच्या निधनाने जळकोट शहरावर शोककळा पसरली आहे. 

आज अंत्यसंस्कार 
शहरातील बसस्थानकातील खुल्या जागेवर गुरुवारी (ता. १५) दुपारी बारा वाजता रोहित शिंगाडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली. तहसील कार्यालयात नगरपंचायत, पोलिस, तहसील प्रशासन, विविध पक्षांचे पदाधिकारी, शिंगाडे कुटुंबीय यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com