दुसऱ्यांची घरे फोडणाऱ्यांचा पक्ष आता बुडणार; पवारांना टोला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

मला कुणाबद्दल घृणा नाही वाईट मतही नाही. परंतु, पवारांनी दुसऱ्यांच्या घरात वितुष्ट आणून घरे फोडली’ असा गंभीर आरोपही जयदत्त क्षीरसागर यांनी केला. त्यात पहिल्यांदा दिवंगत मुंडेंचे घर फोडल्याचेही ते म्हणाले. त्याचे आता पवारांनीच आत्मपरिक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

बीड : 15 वर्षांत काय केले हे आज विचारता, तेंव्हा का नाही विचारले, पक्षात होणारी कोंडी फोडण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला. घरफोडी करणाऱ्यांचा पक्ष आता बुडणार असा टोला रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. 

रविवारी (ता. २२) शिवसेनेच्या मेळाव्यात क्षीरसागर बोलत होते. मागच्या आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर पक्षांतराच्या कारणाबाबत टिका करत आता विकासासाठी गेला असे कारण सांगता तर पंधरा वर्षे सत्ता तुमच्या हातात दिली तेव्हा काय केले, असा सवाल केला होता. त्याला क्षीरसागर यांनी उत्तर दिले.

क्षीरसागर म्हणाले, मला कुणाबद्दल घृणा नाही वाईट मतही नाही. परंतु, पवारांनी दुसऱ्यांच्या घरात वितुष्ट आणून घरे फोडली’ असा गंभीर आरोपही जयदत्त क्षीरसागर यांनी केला. त्यात पहिल्यांदा दिवंगत मुंडेंचे घर फोडल्याचेही ते म्हणाले. त्याचे आता पवारांनीच आत्मपरिक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayadatta Kshirsagar attacks Sharad Pawar in Beed