‘जायकवाडी’त ४० टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पैठण - जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात गुरुवारी (ता. २३) एकूण चार टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यामुळे धरणाचा एकूण पाणीसाठा ४० टक्के झाला आहे. जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धरणाची पाणीपातळी १५०८.६८ फूट असून, मीटरमध्ये ४५९.८४६ आहे. एकूण पाणीसाठा १५९४.७२३ दशलक्ष घनमीटर आहे. 

उपयुक्त साठा ८५६. ६१८ दशलक्ष घनमीटर आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून ३४ हजार क्‍युसेक पाण्याची आवक होत असल्यामुळे आज दिवसभरात चार टक्के वाढ होऊन पाणीसाठा ४० टक्‍क्‍यांवर गेला. पाणी दाखल होण्याची परिस्थिती यापुढेही अशीच सुरू राहिली, तर पावसाळ्याच्या शेवटच्या सप्टेंबर महिनाअखेर अर्धे धरण भरण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. आज ३४ हजार क्‍युसेक पाणी दाखल झाल्यामुळे धरण व्यवस्थापनाच्या यंत्रणेने वाढत्या पाणी पातळीच्या नोंदीकडे विशेष लक्ष केंद्रित केले. त्यानुसार केलेल्या पातळीच्या नोंदीचा अहवाल जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाला कळविला आहे. दरम्यान, धरण पाणलोट क्षेत्रातील वरील भागातील धरणांच्या यंत्रणेकडून किती पाण्याचा विसर्ग करण्यात आला, याची माहिती वेळोवेळी घेतली जात असून, त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.

पाणीपातळीत रात्रीतून मोठी वाढ 
नाशिक, नगर या पाणलोट क्षेत्रातून पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावत आहे. वेगाने दाखल झालेल्या पाण्यासह धरण परिसरात वारा सुटल्याने मोठमोठ्या लाटा धरणाच्या पात्रात पाहायला मिळत आहेत. यामुळे धरण बघण्यासाठी आलेले पर्यटक पाण्याच्या लाटांचा आनंद घेत आहेत. 

Web Title: Jayakwadi Dam Water Storage