'भाजप पक्षाकडे सर्वात जास्त संपत्ती'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

नांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे. परंतु धुळे, अहमदनगर आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निवडणूकीचे चित्र बघता भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने साम, दाम, दंड भेद वापरून निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे देशात सर्वात जास्त सत्ता आणि संपत्ती भाजपाकडे असल्याचे सिद्ध होते, असा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर नवनियुक्त सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते सोमवारी (ता. 10) शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यालयामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ‘कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश असो वा महाराष्ट्रातील धुळे, लोहा असो सर्वच ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या डोळ्यांसमोर भाजपने आर्थिक व्यवहार, आचारसंहितेचा भंग करुन निवडणूका जिंकल्या आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशिनवर लोक शंका घेत असून, राष्ट्रवादीच नव्हे तर इतर पक्षांनी सुद्धा ईव्हीएम मशिन वापरास विरोध केल्याचेही पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस पक्षाची आघाडी होण्याची शक्यता असून, समातावादी, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी संघटना, कम्युनिष्ट पक्ष यासह इतर लहान मोठ्या समविचारी पक्षांनाही सोबत घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरु आहे. कुठल्याही परिस्थितीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करायचेच, हे ध्येय निश्‍चित केल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.  पत्रकार परिषदेला शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल कदम, जिल्हाध्यक्ष ग्रामीण बापुसाहेब गोरठेकर, माजी आमदार शंकर अण्णा धाेंडगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती दत्तु रेड्डी, प्रदेशउपाध्यक्ष महम्मद खान पठाण, महिला परदेश सरचिटणीस कल्पना
डोंगळीकर, प्रांजली रावणगावकर, हरीहर भोसिकर, शिवाजी वाडेकर, विक्रम
देशमुख, गणेश तादलापूरकर, रऊफ जमिनदार, कन्हैया कदम उपस्थित होते.

बहुमताने निवडून येणाऱ्यालाच तिकिट
राष्ट्रवादी पक्षातून भाजपात गेलेल्या लोकांना चार वर्षानंतर देखील त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. त्यामुळे अनेकजण स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याचे सांगून जागा वाटपा बद्दल निश्चित फार्मुला नाही. परंतु, जे बहुमताने निवडून येऊ शकतील अशाच लोकांना निवडणूकीसाठी तिकीट दिले जाईल हाच फार्मुला राहणार आहे.- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी)

Web Title: Jayant Patil Criticized BJP