जीपच्या धडकेत चिमुकला ठार

accidnet
accidnet

आडुळ : भरधाव पिकअप जिपने दुचाकीला जोराची धडक दिल्याने आईवडील गंभीर जखमी तर त्यांचा आठ वर्षीय मुलगा जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव - पांढरी (ता. औरंगाबाद, जि. औरंगाबाद) शिवारात शुक्रवारी (ता. 4) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. 

कठु शेखलाल शेख (वय 33), नसरीन कठु शेख (वय 30) हे पती-पत्नी त्यांचा आठ वर्षीय मुलगा अरमान कठु शेख हा आजारी असल्याने त्याला दुचाकीवरून (एमएच 20 सीए 5322) औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी शुक्रवारी सकाळी नेले होते. त्याच्यावर उपचार केल्यानंतर परत घरी रांजणगाव दांडगा (ता. पैठण) येथे येत असतांना पिंपळगाव -पांढरी शिवारात त्यांच्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या पिकअप जिपने (एमएच 21 एक्स 5120) जोराची धडक दिली. यात अरमान या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याची आई नसरीन व वडिल कठु शेख हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची नोंद करमाड पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे.  

दिशादर्शक फलकच नाहीत
सध्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून कुठे ही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही. जागोजागी एकेरी वाहतुक वळविण्यात आली आहे. ज्या वाहनामुळे हा अपघात झाला ते वाहन या रस्त्याचे काम करणारे 
वाय पी डी कंस्ट्रक्शनचे होते. यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com