जीप नदीपात्रात कोसळली

अपघातग्रस्त जीप
अपघातग्रस्त जीप

जिंतूर (जि.परभणी) : महिला रुग्णास औरंगाबाद येथे उपचारासाठी घेऊन जात असलेली जीप शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर जिंतूर-जालना राज्य महामार्गावरील पुलावरून नदीपात्रात कोसळली. यात चार जण गंभीर जखमी झाले. मंगळवारी (ता.२६) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.


 नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील भागीरथाबाई जाधव (वय ६८) यांना वैद्यकीय उपचारासाठी त्यांचे कुटुंबीय औरंगाबाद येथे नेत असताना जीपचालकाला पुलावरील रस्त्याच्या बाजूचा अंदाज न आल्याने जीप नदीपात्रात कोसळली. यामध्ये वनिता शिवाजी गिरामकर (वय ४०), दत्तराव लक्ष्‍मण जाधव (वय ७०), कृष्णा शिवाजी गिरामकर (वय २५, सर्व राहणार हादगाव,जि.नांदेड), हे जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी परभणी येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

जीप अलिकडेच अडकली 
पहाटे घडलेल्या अपघातानंतर मोठा आवाज झाला. याचवेळी अकोली येथील काही गावकरी पहाटे उठले होते. काहीजण शेताकडे निघाले होते. त्यांनी झालेल्या आवाजाकडे जात पाहिले असता त्यांना जीप नदीपात्रात दिसली. या वेळी आतमध्ये अडकलेले जखमी मदतीसाठी धावा करत होते. त्याचवेळी देवदुत म्हणून आलेल्या ग्रामस्थांनी आरडाओरड करत अन्य लोकांनी बोलावत जखमींना रुग्णालयात नेले. याच ठिकाणी खाली विहीर आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे विहीर पूर्णपणे भरलेली आहे. सुदैवाने जीप अलिकडेच अडकली नसता मोठा अनर्थ घडला असता.


 ‘रेडीएटर’ नसल्याने अपघात

 जिंतूर-जालना या राज्य रस्त्यावर खड्डेच खड्डे असून वळणाच्या तसेच पुलांवरील सार्वजनिक बांधकाम विभागाने रेडीएटर बसविले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकाला रस्त्याचा अंदाज आला नसल्याने हा अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे. दोन महिन्यापूर्वी याच पुलावरून जिंतूर- पुणे जाणारी ट्रॅव्हल्स पन्नास प्रवाशांसह पुलावरून नदीपात्रात कोसळली होती.

जिल्ह्यातील महामार्गांची दयनीय  आवस्था

दरम्यान, जिल्ह्यातील परभणी-वसमत या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडत सुर आहे. याच रस्त्यावर पूर्णा नदीवर असलेल्या राहटी पुलाला कठडे नसल्याने धोकादायक बनला आहे. तसेच देवगावफाटा-सेलू महामार्गावरील करपरा नदीवरील पुलाचीही दायनिय अवस्था झाली असून या पुलाचेही कठडे नाहीसे झाले आहेत. परभणी - जिंतूर महामार्गाचे काम सुरु आहे.  या मार्गासाठी संघटनांनी मोठे आंदोलन उभारले होते. प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर रस्त्याच्या कामाला सुरवात झाली. परंतू, त्यातही अनेक ठिकाणी धोकादायक खोदकाम केल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. याशिवाय परभणी - गंगाखेड या राज्यरस्त्याच्या कामासही सुरवात झाली आहे. मात्र, सदरील काम संथगतीने सुरु आहे. रस्त्यावर खोदकाम केल्याने मार्गावरुन जाताना कसरत करावी लागत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com