जेटचे विमान मुंबईला बिघडले 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी (ता. 29) सायंकाळी येणाऱ्या जेट एअरवेजच्या मुंबई-औरंगाबाद विमानात मुंबईत तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, मुंबई-औरंगाबाद आणि औरंगाबाद-मुंबई या दोन्ही विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले.

विमानाचे उड्डाण रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 
जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद विमान मंगळवारी सायंकाळी सव्वापाच वाजता येण्याऐवजी साडेसहा वाजता येणार असून, परतीच्या प्रवासाला हे विमान 6.55 वाजता उड्डाण करणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. जेटच्या विमानाने औरंगाबादहून 126 प्रवासी मुंबईला जाण्याच्या तयारीत होते. विमानाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विमान रद्द झाल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. त्यानंतर मात्र अचानक विमान रद्द झाल्याच्या माहितीने प्रवासी संतप्त झाले.

विमान रद्द झाले असले तरीही अन्य विमानाची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांनी लावून धरली; मात्र नवीन विमान येऊ शकत नसल्याचे जेटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर काही प्रवाशांनी एअर इंडियाच्या विमानाने जाणे पसंत केले; तर काहींनी प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला. काहींनी मात्र बुधवारच्या विमानाने जाण्यास पसंती दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com