टाक बंधूंना धमकाविल्याच्या निषेधार्थ परळीत सराफांचा बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

परळी वैजनाथ - येथील सराफा व्यापारी सुमित टाक व संदीप टाक या बंधूंना मुंबई येथील क्राईम ब्रॅंचच्या पोलिस अधिकाऱ्याने शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या निषेधार्थ बुधवारी (ता. 22) येथील सराफा बाजार कडकडीत बंद ठेवण्यात आला. 

गेल्या सोमवारी (ता. 20) टाक बंधूंना मोबाईलवर एका गुन्ह्याच्या संदर्भात मुंबई येथील क्राईम ब्रॅंचचे पोलिस निरीक्षक लवाटे यांनी दूध्वनीवरून शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आला. या बंदचे आवाहन शहरातील सराफा सुवर्णकार संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. बंद कडकडीत पाळण्यात आला. सराफा बाजारातील सर्व व्यवहार बंद होते. दरम्यान, या प्रकरणी मंगळवारी येथील शहर पोलिस ठाण्यात टाक बंधूंसह सराफ सुवर्णकार संघटनेने निवेदन दिले असून या घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

Web Title: jeweller band in parli vaijnath