सराफा बाजारात कोट्यवधींची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016

लातूर - गेले काही महिने गर्दी नसलेला येथील सराफा बाजार मंगळवारी (ता. ११) मात्र ग्राहकांनी भरून गेला होता. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला विजयादशमीचा मुहूर्त साधत ग्राहकांनी सोने खरेदीला पसंती दिली. यातून येथील सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. 

यावर्षी लातूर दुष्काळाच्या सावटाखाली होते; पण परतीच्या पावसाने मात्र वातावरणच बदलून टाकले आहे. सर्वच घटकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येथील सराफा बाजारदेखील काही दिवस थंडच होता. 

साडेतीन मुहूर्तांपैकी विजयादशमी सणाचा मुहूर्त आहे. या दिवशी सोने खरेदीला महत्त्व दिले जाते. त्यात पाऊस पाणी चांगले झाल्याने सराफ बाजारावर चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले. सकाळपासूनच या बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी राहिली. येथे चारशे सराफ व सुवर्णकारांची दुकाने आहेत. या दुकानातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. नामांकित दुकानांत ग्राहकांची मोठी गर्दी होती. शुद्ध सोन्याच्या तयार दागिन्यांना अधिक मागणी राहिली. चार-पाच दिवसांपूर्वी सोन्याचा भाव ३१ हजारांवर होता; पण आज तीस हजार ३०० वर हा भाव राहिला. त्यामुळे एक हजाराने भाव कमी झाला होता. दिवसभर सराफांच्या दुकानांत गर्दी राहिली.

विजयादशमीचा मुहूर्त असल्याने ग्राहक सराफा बाजारात आले. पाऊस चांगला झाल्याने खरीप गेले तरी रब्बीचे पीक येईल, अशी आशाही शेतकऱ्यांना आहे. त्याचा परिणामही बाजारात दिसला. मुहूर्त व लग्नसराई यामुळे ग्राहक बाजारात आले. शुद्ध सोन्यापासून तयार केलेल्या दागिन्यांना ग्राहकांची मागणी राहिली. 
- रामभाऊ चलवाड, मराठवाडा उपाध्यक्ष, सराफ सुवर्णकार फेडरेशन.

Web Title: jewellery market transaction at dasara festival

टॅग्स