झन्ना-मन्ना जुगारावर पोलिसांचा छापा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

नांदेड : विनापरवानगी सुरू असलेल्या झन्ना-मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तेरा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख 13 हजार व जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर सोळंके यांच्या पथकांनी साईनगर भागात शनिवारी (ता. 20) सायंकाळी केली.

इतवारा ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याविरूध्द पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी विशेष धरपकड मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेवर फौजदार साळुंके आपल्या पथकासह मॅफको परिसरात गस्तीवर होते. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी सायंकाळी चारच्या सुमारास साईनगर भागात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

यावेळी पोलिसांनी अहेमद शकिल अहेमद सुलतान, वसीमखान महेबुब खान, शेख अकबर शेख वहीद, शेख इलियाज शेख खमर, शेख इस्माईल शेख गौस, आकाश रमेश इंगोले, सय्यद हुसेन, शेख मस्जीद, कैलास बिगानीया, रवी पवार, नदीम सय्यद, सय्यद शकील आणि सरवरखान यांना अटक केली. त्यांच्याकडून तपासणीत व अंगझडतीत 12 हजार 830 रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले. या सर्वांची इतवारा ठाण्यात रवानगी करून फौजदार सोळंके यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक  मांडवकर हे करीत आहेत. 

Web Title: Jhanna-Manna gambling raid for police