जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त रॅलीने वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

औरंगाबाद - जिजाऊ जन्मोत्सवानिमित्ताने शहरात काढण्यात आलेल्या भव्य चारचाकी वाहन रॅलीचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. शहरातील विविध भागांत या रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

औरंगाबाद - जिजाऊ जन्मोत्सवानिमित्ताने शहरात काढण्यात आलेल्या भव्य चारचाकी वाहन रॅलीचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. शहरातील विविध भागांत या रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

बुलंद छावा संघटनेतर्फे ही रॅली आयोजित करण्यात आली होती. क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सकाळी साडेदहा वाजता विजेता कोरडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर क्रांती चौक ते पैठणगेट रस्त्यावर वाहन रॅलीत उघड्या जीपमध्ये ठेवण्यात आलेल्या जिजाऊ आणि शिवबा पुतळ्याचे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, तर डॉ. वृषाली देशमुख यांनी जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर या रॅलीस संभाजीराजे यांनी भगवा झेंडा दाखवत उपस्थित महिला, नागरिकांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. संभाजीराजे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

याप्रसंगी बुलंद छावा संघटनेचे प्रदेश सचिव सुरेश वाकडे, प्रभाकर मते, बाळासाहेब थोरात, सतीश वेताळ, नितीन शेळके, साहेबराव मुळे, ज्ञानेश्‍वर जाधव, प्रदीप हारदे, मनोज गायके, अनुराधा दानवे, ज्योती उबाळे, मनीषा वडजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी उपस्थित मान्यवरांचे समितीच्या अध्यक्षा बेबी वेताळ, स्वागताध्यक्ष निर्मला मते, गयाबाई मुळे, चेतना गायके, प्रियंका जुये, सविता वाकडे, आशा गावडे, अलका आगळे, रेखा वेताळ, कमल चव्हाण, जयश्री जैवा, भारती पाटील, मीना बोरसे, कमल काळे, सुनीता मते, संगीता लोखंडे, आरती गायके, ज्योती विधाते, सीमा चव्हाण, उषा चव्हाण, सुनीता शेळके, स्वरा गायके, मीना गायके, नंदा सुंभ, अरुणा बढे, वंदना बनकर, अपर्णा कुंटे, स्वाती राऊतराय यांनी स्वागत केले.
क्रांती चौकातून काढण्यात आलेली ही रॅली गुलमंडी, जाधवमंडी, आविष्कार चौक, एम- 2 मार्गे टीव्ही सेंटर संभाजी चौकात नगरसेवक शिवाजी दांडगे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या रॅलीत रामेश्‍वर राजगुरे, योगेश देशमुख, धृपत निकम, दिलीप जाधव, अशोक काळे, अंबादास सोनवणे, अशोक पवार, सुरेश गुये, नानासाहेब बढे, ज्ञानेश्‍वर गायकवाड, बाबू चौधरी, सुरेश बोर्डे, गिरीश मारवाडे, मिलिंद साखळे, संदीप जाधव, रवी गायके, अभिजित काकडे, रतन काळे, तुषार नरवडे, विलास उबाळे, रत्नाकर म्हस्के, कैलास कुंटे, उमेश वाकडे, संदीप वाकडे, महेश पाटील, राहुल कोरडे, संजय बनकर, विजय साखळे, महेश चव्हाण यांच्यासह जिजाऊप्रेमींची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.

Web Title: jijau birth anniversary rally