मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एस टी बस फोडली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

जिंतूर - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या सह मराठा समाजाच्या इतर मागण्या मान्य कराव्या असे पत्रक फेकून दुचाकीवर आलेल्या काही अज्ञात नागरिकांनी एस टी बस वर दगफेक करून काचा फोडून बस जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ही घटना शुक्रवार दि 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली 

या बाबत अधिक वर्त असे की जिंतूर अगाराची बस क्रमांक एम एच 20 बी एल 2928 ही कवडा येथून जिंतूर कडे येत असताना रस्त्यात पिपळगाव शिवारात सदरील बस आल्या नंतर दोन मोटारसायकल वर तोंडाला कापड बांधून आलेल्या चार तरुणांनी बस अडवली व मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,स्वामिनाथन आयोग लागू करावा,एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत सदरील बस वर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली बस वर दगडफेक  होताच बस मधील प्रवाशानी जीव मुठीत धरुन पळ काढला असता त्या तरुणांनी सोबत आणलेल्या पेट्रोल सदृश्य पदार्थ बस च्या मागील सीट वर टाकून बस जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला 

या नंतर सदरील आंदोलक मागण्यांचे  काही पत्रक गाडीत टाकून पळून गेल्याने पुढील अनर्थ टळला.

या बाबत माहिती मिळताच जिंतूर आगाराचे प्रमुख व इतर अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली या बाबत सदरील वर्त लिही पर्यन्त गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: jintur marathwada news st bus damage for maratha reservation