बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

लातूर : नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजी भिमाजी शेलार (रा. नगर) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

हरिश्चंद्र मरेप्पा नामवाड (वय 64, रा. नांदेड नाका, उदगीर) यांच्या मुलाला नगरमधील अर्बन बँकेत क्लर्क म्हणून नोकरी लावतो, असे सांगून शेलार यांनी 5 लाख रुपये घेतले; पण नोकरी लावली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे नामवाड यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी उदगीर शहर पोलीस ठाणे गाठले. तेथे शेलार याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

Web Title: for job in bank fraud of 5 lacks