कुवैतमध्ये नोकरीच्या आमिषाने 13 लाखांना गंडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

लातूर - कुवैतमध्ये नोकरीच्या आमिषाने लातूरसह इतर गावांतील 32 जणांना 13 लाखांना एकाने गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

लातूर - कुवैतमध्ये नोकरीच्या आमिषाने लातूरसह इतर गावांतील 32 जणांना 13 लाखांना एकाने गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

या प्रकरणातील संशयिताचे नाव मोहमद कलील खान असे आहे. त्याची अनेक लग्नं झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याने शेवटचे लग्न अंबाजोगाई येथील एका मुलीशी केले असल्याचा संशयही पोलिसांना आहे. मोहमद कलील खान व त्याच्या दोन साथीदारांनी फेब्रुवारी 2017 पासून लातूरमध्ये बस्तान मांडले. त्यांनी सत्तार रसूल शेख (वय 30, रा. हत्तेनगर) यांना व त्यांच्या 32 साथीदारांना कुवैतमध्ये नोकरी लावतो म्हणून त्यांचे पोसपोर्ट घेतले. तसेच प्रत्येकाकडून 35 हजार ते 40 हजार रुपयेही घेतले. 

गेल्या तीनचार महिन्यांपासून या सर्वांना त्यांना झुलवत ठेवले. आज-उद्या नोकरीचा आदेश येणार आहे. त्यानंतर तुमची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर तुम्हाला कुवैतला पाठविले जाईल असे हे आरोपी 32 जणांना सांगत राहिले. त्यानंतर त्यांनी संपर्क ठेवणेच बंद केले. त्यांचा मोबाईलही बंद ठेवला. त्यानंतर आपण फसविलो गेलो आहेत हे लक्षात आल्यानंतर सत्तार शेख यांच्या फिर्यादीवरून मोहंमद कलील खान व त्याच्या दोन साथीदारांवर येथील गांधी चौक पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पवार यांनी दिली.
 

Web Title: Job lure in Kuwait