पत्रकारिता हत्यार नसून चळवळ - उत्तम कांबळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

तुळजापूर - पत्रकारिता हत्यार नसून एक सामाजिक चळवळ आहे. काम करा म्हणजे काळ पुढे नेतो. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवणारी असते, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी शुक्रवारी (ता. सहा) व्यक्त केले. लोहिया धर्मशाळेत सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. भूमिपुत्रांनी पत्रकारितेत शिरणे आवश्‍यक आहे, असेही ते म्हणाले.

तुळजापूर तालुका पत्रकार संघातर्फे श्री. कांबळे यांना श्री. तुळजाभवानी पत्रकारिता पुरस्कार आणि पत्रकार राजेंद्र हुंजे यांना (कै.) क. भ. प्रयाग पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. आमदार मधुकरराव चव्हाण अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष ऍड. धीरज पाटील, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, उपनगराध्यक्ष पंडितराव जगदाळे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष प्रकाश देशमुख, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष डॉ. सतीश महामुनी आदी उपस्थित होते.

पत्रकारांना कायद्याने संरक्षण देण्याची मागणी होत आहे. त्यापेक्षा समाजाने पत्रकारांना सरंक्षण द्यावे, असे मत माजी न्यायमूर्ती देशमुख यांनी मांडले. मानपत्राचे वाचन कवी राजेंद्र अत्रे (उस्मानाबाद) यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सतीश महामुनी यांनी केले. या वेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, नगरसेवक बापू कणे, सचिन रोचकरी, विजय कंदले, किशोर साठे, विशाल रोचकरी, राहुल खपले, अमर मगर, अमर हंगरगेकर, बचू शिंदे, अविनाश गंगणे, कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे माजी चेअरमन अशोक मगर, शिवसेनानेते संजय निंबाळकर, छावा युवा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जीवन इंगळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य संभाजी भोसले, "रोटरी'च्या सचिव अनुराधा चेडे, ज्येष्ठ पत्रकार भारत गजेंद्र गडकर, उत्तम अमृतराव, पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, ज्येष्ठ गायक शिवहारराव वट्टे आदी उपस्थित होते.

Web Title: Journalism is not a movement of the tool