साडेसतरा तोळ्यांचे दागिने प्रवासात लंपास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

पुणे ते सालोरा असा बसमधून प्रवास करणाऱ्या एका अभियंत्याची साडेसतरा तोळे वजनाचे दागिणे असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड : पुणे ते सालोरा असा बसमधून प्रवास करणाऱ्या एका अभियंत्याची साडेसतरा तोळे वजनाचे दागिणे असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुखेड तालुक्यातील कर्णा येथील राहणारे परंतु सध्या पुणे येथे एका कंपनीत कार्यरत असलेले अभियंता बालाजी साखरे हे गावाकडे एका कार्यक्रमानिमित्त कुटुंबियांसह येत होते. पुणे ते सालोरा असा एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करीत होते. त्यांनी आपल्या सोबत दोन बॅग घेतल्या होत्या. त्यापैकी एका बॅगेत सोन्याचे दागिणे होते. ज्यात नेकलेस, कानातील रिंग, बांगड्या, मंगळसूत्र, चैन, पाटल्या, अंगठी, हार असा चार लाख ३७ हजार ५०० रुपयाचे साडेसतरा तोळ्याचे दागिणे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

Web Title: In the journey golden jewellery Theft

टॅग्स