‘न्याय आपल्या दारी’ जिल्हा विधीसेवा प्राधीकरण

प्रल्हाद कांबळे
Sunday, 1 March 2020

‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेतून सुरू केलेल्या फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील निवडक गावांमध्ये ता. दोन मार्च ते ता. २३ मार्चे   या कालावधीत

नांदेड : समाजातील अगदी तळागाळातील लोकांना न्याय मिळावा हे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून सर्वोच्च न्यायालय यांच्या ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेतून सुरू केलेल्या फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील निवडक गावांमध्ये ता. दोन मार्च ते ता. २३ मार्चे   या कालावधीत करण्यात आलेले आहे. 

सोमवारी (ता. दोन) मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांच्या हस्ते फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीरासाठी उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथुन या लोकअदालतसाठी आलेल्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

प्रलंबीत व दाखलपूर्व प्रकरणाचा निपटारा होणार

ता. दोन मार्च ते ता. २३ मार्च या कालावधीत फिरते लोकअदालत हे नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियोजीत गावात फिरून न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच बॅंकांचे, विमा कंपनी, विद्युत महामंडळ, बीएसएनएल व इतर दिवाणी दाखलपुर्व प्रकरणे सदर लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कायदेविषयक शिबीराद्वारे जनजागृती केली जाणार आहे. तसेच या लोकअदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून सेवानिवृत जिल्हा न्यायाधीश कमल वडगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

हेही वाचा पत्नीचा खून, निर्दयी पतीला जन्मठेप

नागरिकांना आवाहन

या फिरत्या लोकन्यायात जास्तीतजास्त प्रलंबीत प्रकरणे ठेवून आपला वाद आपल्या गावाताच मिटवावे असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचीलव तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आर. एस. रोटे केले आहे.  

पोलिस दलातील तीन अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांना निरोप 

नांदेड :  जिल्हा पोलिस दलातील तीन पोलिस अधिकारी व पाच कर्मचारी यांची नियत वयोमानानुसार सेवा निवृत्ती झाली. या सर्वांना पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने भेटवस्तु देऊन निरोप दिला. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, दत्ताराम राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पोलिस अधिक्षक कार्यालयातील चिंतन हॉलमध्ये शनिवारी (ता.२९) दुपारी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निरोप देण्यात आलेले जीपीयुचे पोलिस निरीक्षक विजय निवृत्ती जोंधळे, नियंत्रण कक्षाचे रामराव पाटीलबा गाडेकर, फौजदार सय्यद मईनोद्दीन जियाउद्दीन, किनवट पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अजहर बेग हुसेनबेग इनामदार, मुक्रमाबाद ठाण्याचे उमाकांत तुकाराम जाधव, पोलिस मुख्यालयातील बालाजी मुन्नालाल यादव, उमरी ठाण्याचे किशन रामधन राठोड आणि किनवट पोलिस ठाण्याचे हवालदार मुनीर फरीद शेख यांचा समावेश होता.
 
यांची होती उपस्थिती

या कार्यक्रमाला पोलिस उपाधीक्षक (गृह) सिद्धेश्‍वर धुमाळ, पोलिस कल्याणचे पंडीत मुंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश लांडगेयांच्यासह पोलिस अधिक्षक कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Judgment at your door District legislative service provision nanded news.