आत्मक्लेश आंदोलनाने वेधले शासनाचे लक्ष, लातूर जुक्टाच्या सदस्यांचा सहभाग

आत्मक्लेश आंदोलनाने वेधले शासनाचे लक्ष, लातूर जुक्टाच्या सदस्यांचा सहभाग

लातूर : लातूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक (जुक्टा) संघटनेच्या सदस्यांनी मंगळवारी (ता.२६) विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिवसभर घरातच आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन केले. यात जिल्ह्यातील नऊशे अनुदानित व विनाअनुदानित प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. या संघटनेने मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले.


विनाअनुदानित घोषित कनिष्ठ महाविद्यालय १४६ व एक ६३८ महाविद्यालयाचा मंजूर निधीचा वितरणाचा आदेश काढावा, मंत्रालय स्तरावर अघोषित महाविद्यालयांना घोषित करून अनुदान आदेश काढावा, वाढीव पदांना मान्यता द्यावी, आयटी विषयाला अनुदान द्यावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, अतिरिक्त विषयाला अनुदान द्यावे आदी मागण्या या संघटनेच्या आहेत. सध्या कोरोनामुळे टाळेबंदी सुरू आहे. त्यामुळे संघटनेच्या सदस्यांनी घरात बसूनच आत्मक्लेशन आंदोलन केले.

जिल्ह्यात या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराम सूर्यवंशी, सचिव प्रा.बाळासाहेब बचाटे, कार्याध्यक्ष प्रा. संजय भंडारे, विभागीय प्रतिनिधी उदय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मारूरुती सूर्यवंशी, प्रा. सी. जे. पाटील, प्रा. रामलिंग बिडवे, प्रा. अनिल जाधव, सहसचिव प्रा. रमेश केंद्रे, प्रा.संतोष हुडगे प्रा. गोविंद पडिले, कार्यालयीन सचिव प्रा. शिवाजी धनगे, कोषाध्यक्ष प्रा. एकनाथ पाटील, सहकोषाध्यक्ष प्रा. बळवंत सूर्यवंशी, प्रा. दत्तात्रय कांबळे, प्रा. रेश्मा पठाण, प्रा.अर्चना सूर्यवंशी, प्रा.सुधीर कल्लूकर, प्रा. संतोष उपासे, प्रा. दत्तात्रय मुळे, प्रा.डी.व्ही.राजे, प्रा.गणेश मस्तापुरे आदी सहभागी झाले होते.
-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com