परभणी पोलिस दलात जम्बो बदल्या, २५६ पोलिसांचा समावेश   

sp office
sp office

परभणी ः परभणी पोलिस दलातील पोलिस शिपाई, पोलिस नाईक, पोलिस हवालदार व सहायक फौजदार संवर्गातील २५६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यंदाच्या वर्षातील या जम्बो बदल्या म्हणून ओळखल्या जात आहेत. दरम्यान, बदल्या झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी रुजु होण्याचे आदेश पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी बजावले आहेत. 

परभणी पोलिस दलात गेल्या वर्षभरात मोठ्या बदल्या झाल्या नव्हत्या. त्यातच मार्चपासून कोरोनाचा संसर्ग झाल्याने राज्य शासनाने कुण्याही संवर्गातील बदल्या करू नका असे आदेश दिले होते. परंतू, आता बदल्या करण्यास राज्य शासनाने मुभा दिली आहे. 

फौजदार संवर्गातील २३ कर्मचारी 
परभणी पोलिस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने मंगळवारी (ता.२९) सांयकाळी जिल्ह्यातील पोलिस शिपाई, पोलिस नाईक, पोलिस हवालदार व सहायक फौजदार संवर्गातील २५६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात पोलिस शिपाई संवर्गातील सर्वाधिक १०३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्या खालोखाल पोलिस नाईक संवर्गातील ७१ कर्मचारी, पोलिस हवालदार संवर्गातील ५९ तर सहाय्यक फौजदार संवर्गातील २३ कर्मचाऱ्यांना बदलीवर पाठविण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी मंगळवारी सायंकाळी काढले आहेत. 

प्रशासकीय कारणास्तव बदली
या सर्व बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्याचे बदली आदेशात नमुद केले. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात बदल्या होण्याची ही या दोन वर्षातील पहिलीच घटना आहे. राज्य शासनाने ता.३० जुलै रोजी सर्वसाधारण बदल्या त्या-त्या संवर्गातील एकूण कार्यरत पदाच्या १५ टक्के एवढ्या मर्यादेत करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यामुळे या बदल्या करण्यात आलेल्या आहेत असे बदली आदेशात म्हटले आहे. 

बदली न झालेल्यांच्या २०२१ मध्ये बदल्या 
मंगळवारी काढलेल्या बदली आदेशात २५६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हांतर्गत पोलिस ठाण्यात, पोलिस मुख्यालयात व इतर ठिकाणी करण्यात आल्या आहेत. ज्या पोलिस कर्मचाऱ्याच्या या जम्बो आदेशात बदल्या झाल्या नाहीत त्यांच्या बदल्या या २०२१ मध्ये केल्या जाणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com