ज्युनिअर चार्ली करणार देहदानाची जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

औरंगाबाद - देहदान हे पवित्र दान आहे. समाजात याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने औरंगाबादचा ‘ज्युनिअर चार्ली’ म्हणजेच सोमनाथ स्वभावणे चार ते १८ जुलै हा चौदा दिवसांचा प्रवास करणार आहे. औरंगाबाद ते अमरनाथ या चार हजार किलोमीटरच्या प्रवासात देहदान जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. 

औरंगाबाद - देहदान हे पवित्र दान आहे. समाजात याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने औरंगाबादचा ‘ज्युनिअर चार्ली’ म्हणजेच सोमनाथ स्वभावणे चार ते १८ जुलै हा चौदा दिवसांचा प्रवास करणार आहे. औरंगाबाद ते अमरनाथ या चार हजार किलोमीटरच्या प्रवासात देहदान जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. 

औरंगाबाद ते अमरनाथदरम्यान रेल्वे, बसने प्रवास करून देहदान जनजागृती अभियान राबविण्यासाठी ज्युनिअर चार्ली यांच्या पत्नी रूपाली, अभिजित निकम, राहुल शिंदे, सचिन चव्हाण, विजय हिवाळे, रामेश्वर अपशिंगे, संतोष जाधव, विष्णू जाधव, राम सुरत, पंकज कुमार आणि शारदा कानकाटे यांचा समावेश असणार आहे. या प्रवासात देहदानाचे महत्त्व सांगणारे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पाच हजार स्टिकर प्रवाशांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, पहेलगाव ते अमरनाथ हा २५ किलोमीटर लांबीचा अवघड प्रवास सोमनाथ स्वभावणे चार्लीच्याच वेशात करणार आहे. रस्त्यात ज्या ठिकाणी रेल्वे अथवा बस थांबेल, त्या-त्या ठिकाणी थांबून देहदानाबद्दल जनजागृती केली जाणार आहे. 

‘ख्रिसमस डे’पासून सुरवात 
‘ख्रिसमस डे’च्या दिवशीच चार्ली चॅप्लीन यांचा स्मृतिदिन असतो. त्यामुळे त्यांना मानवंदना देण्याच्या उद्देशाने २५ डिसेंबर २०१७ पासून या मोहिमेला श्री. स्वभावणे यांनी सुरवात केली. फक्त लोकांना उपदेश न करता दोनशे लोकांसह स्वतः देहदानाचा संकल्प केला. यासाठी त्यांनी शहरातील विविध भागांत जाऊन लोकांची देहदानाबद्दल जनजागृती केली.

देहदानाचा संकल्प करण्यासाठी काही लोक स्वत:हून पुढे येत आहेत. अंत्यसंस्कारानंतर आपले अमूल्य शरीर वाया घालविण्यापेक्षा ते सत्कर्मी लागावे यासाठी एक वर्षापासून जनजागृती करीत आहे. चार्लीच्या माध्यमातून मी लोकांना आवाहन करतो. त्यामुळे चार्लीही लोकांच्या मनात जिवंत असेल आणि लोकांना हसविण्याचा मलाही आनंद मिळेल.
- सोमनाथ स्वभावणे, ज्युनिअर चार्ली

Web Title: Junior Charlie body donate Public awareness