'संविधानाद्वारे सर्व जाती-धर्मांना न्याय'

'संविधानाद्वारे सर्व जाती-धर्मांना न्याय'

जायकवाडी - ‘‘ भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जगात सर्वाधिक पुतळे आहेत. त्यांनी दलितांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी लढा दिला. संविधान लिहिताना त्यांनी सर्व जाती-धर्मांना न्याय देण्याचा दृष्टिकोन ठेवला,’’ असे प्रतिपादन  केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पैठण औद्योगिक वसाहत परिसरातील मुधलवाडी गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, लोकार्पण मंगळवारी (ता.२३) दुपारी श्री. आठवले यांच्या हस्ते झाले. 

यावेळी पैठणचे आमदार संदीपान भुमरे, मुर्डेश्वर संस्थानचे महंत बालयोगी काशिगिरी महाराज, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, पप्पू कागदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, बाजार समितीचे संचालक कारभारी लोहकरे, सरपंच भाऊ लबडे, सरपंच साईनाथ सोलाट, जिल्हा परिषद सदस्य अक्षय जायभाय, दादा बारे, माजी सरपंच संतोष मगरे, ब्रह्मानंद चव्हाण, संजय ठोकळ, प्रशांत शेगावकर, एस.डी.मगरे, अरविंद अवसरमल, दौलत खरात, बळिराम औटे, सुंदरराव निसर्गंध, तहसीलदार एम. डी. मेंडके, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

श्री. आठवले म्हणाले, ‘‘ केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार आहे. महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गाजत आहे. त्यांना कर्जमाफी देण्याला आमच्या रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. जर शेतकरी जगला तरच महाराष्ट्र व देश जगेल. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता उर्वरित पन्नास टक्‍क्‍यांच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. आगामी दोन वर्षांत सामाजिक न्याय विभागाची रखडलेली कामे पूर्ण केली जातील.’’

आमदार भुमरे म्हणाले, ‘‘मुधलवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. डॉ.आंबेडकरांनी घालून दिलेला सामाजिक आदर्श तरुण पिढीसाठी स्फूर्तीदायक राहील. पैठण औद्योगिक वसाहतीमधील मोडकळीस आलेल्या औद्योगिक वसाहतीला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी केंद्रीय स्तरावरून सहकार्य करावे. औद्योगिकीकरण झपाट्याने वाढण्याच्या दृष्टीने मदत करावी. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी याचा उपयोग होईल.’’ अण्णासाहेब लबडे, बाबूराव कदम यांची भाषणे झाली.  

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष तथा सरपंच भाऊ लबडे, सोमनाथ जाधव, दिलीप गोटे, प्रकाश लबडे, भरत मुकुटमल, काकासाहेब बर्वे, अनिल जाधव, माजी सरपंच शिवाजी जाधव, उपसरपंच सुरेश शिंदे, दादा मुळे, अनिल रोडे, गणेश बोंबले, ग्रामसेवक अशोक आहेर, अनिल आढाव, अशोक जाधव, दीपक गव्हाणे, प्रमोद सातपुते, राहुल धायजे, विजय सुते, जीवन गोटे , प्रा.कल्याण खरात, संकेत सूर्यनारायण, उत्तम मिसाळ, अशोक मिसाळ, बंडू आगळे, सतीश साळवे, नितीन चाबुकस्वार, शिवाजी आगळे, जयेश गोटे आदींसह ग्रामस्थांनी मदत केली. भाऊ लबडे यांनी आभार मानले.

दिलीप गोटे, निसर्गंध यांचा सत्कार         
मुधलवाडी येथील माजी पंचायत समिती सदस्य दिलीप गोटे यांच्यासह ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून, लोकवर्गणीतून डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी झाली. त्यानंतर पुतळ्याचे अनावरण, लोकार्पण अद्याप प्रलंबित होते. परंतु आमदार भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे ठरले. त्या अनुषंगाने श्री. आठवले या कार्यक्रमास उपस्थित राहिले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिलीप गोटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सुंदरराव निसर्गंध यांचाही सत्कार झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com