जालन्यात अल्पवयीन मुलाचा मारहाणीत मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

तीन दिवसांपूर्वी मयत सोन्या ऊर्फ रोहित जाधव व सराईत गुन्हेगार तान्या ऊर्फ विक्की जाधव याच्यासह आठ जण लोहार मोहल्ला येथील शेख मासुम शेख यांच्यावर तलवारीने हल्ला करून एक लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याचा गुन्हा सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.

जालना : शहरातील लोहार मोहल्ला येथील सोन्या ऊर्फ रोहित जाधव याला रविवारी (ता.नऊ) रात्री बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी नऊ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

तीन दिवसांपूर्वी मयत सोन्या ऊर्फ रोहित जाधव व सराईत गुन्हेगार तान्या ऊर्फ विक्की जाधव याच्यासह आठ जण लोहार मोहल्ला येथील शेख मासुम शेख यांच्यावर तलवारीने हल्ला करून एक लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याचा गुन्हा सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर लोहार मोहल्ला येथील नागरीकांनी सराईत गुन्हेगार तान्या ऊर्फ विक्री जाधव याच्या घराची तोडफोड केली होती. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात 30 ते 40 जणांविरोधत राईटचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोन्या उर्फ रोहित जाधव (वय १७) रविवारी (ता.नऊ) रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान कुंडलिका नदीतून पडलेले घर पाहण्यासाठी येत असताना त्याला काही अज्ञातांनी येथील एका नाल्यात गाठून बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारदरम्याण  सोन्या ऊर्फ रोहित जाधव यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लोहार मोहल्ला परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच पोलिसांनी आतापर्यंत नऊ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान सोन्या ऊर्फ रोहित जाधव याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: juvenile criminal dead in Jalna