15 हजाराचे दागिने लंपास, महिलेची फसवणूक

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 26 जून 2019

नांदेड : आमच्या मालकाला मुलगा झाला... ते गरीब महिलांना बक्षिस वाटप करीत आहेत... आपणही या... असे म्हणून एका महिलेला रस्त्याच्या कडेला नेऊन तुमच्याजवळील दागिणे काढून ठेवा... नसता तुम्हाला बक्षिस मिळणार नाही...असे भासवून महिलेच्या दागिण्याच्या पिशवीची अदलाबदल करून पंधरा हजाराचे दागिणे लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. 25) दुपारी एकच्या सुमारास महालक्ष्मी आॅइल शोरुम, गोकूळनगर भागात घडली. 

आंबेडकरनगर भागात राहणारी महिला रमा महादळे ही कामानिमित्त गोकूळनगर भागात आली होती. तिला एकटीला गाठून अनोळखी चोरट्यांनी आमच्या मालकाला मुलगा झाला आहे. ते समोरच्या दुकानावर बक्षिस वाटप करीत आहेत. सर्वात अगोदर गरीब महिलांना बक्षिस वाटप करणार आहेत. तुम्ही आपले दागिणे एका पिशवीत टाकून गरीब म्हणून पुढे जा असा सल्ला दिला. यावेळी या चोरट्यांनी तीचे कानातील व गळ्यातील तसेच नगदी 500 रुपये असा 15 हजाराचा एेवज असलेली पिशवीची अदलाबदल करून तिला पुढे पाठविले. समोर गेल्यानंतर तिथे कोणीच असा दुकानदार बक्षिस वाटप करीत नव्हता. हे तिच्या लक्षात आल्यानंतर तीने पिशवीतील दागिने पाहिले असता ते आढळून आले नाही. महालक्ष्मी आॅईल शोरुमसमोर जावून पाहते तर चोरटे पसार झाले. पिडीत महिला आपल्या घरी गेली. घडलेला प्रकार तिने परिवाराला सांगितला.

सायंकाळी तिच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विश्वासघाताने चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार माणिक कदम हे करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jwellery of 15 thousand get stoles