राशिभविष्य : कर्क, वृश्चिक, सिंह राशीच्या लोकांनो उद्या सावध राहा

टीम ई सकाळ
Friday, 13 March 2020

गेल्या २४ जानेवारीपासून कुंभ राशीला साडेसाती चालू झाली आहे. धनु, मकर आणि कुंभ या राशीना सध्या साडेसाती आहे. मात्र २४ जानेवारीलाच वृश्चिक राशीची साडेसाती संपली आहे. त्याचबरोबर कर्क आणि सिंह राशीच्या लोकांनाही साडेसाती नाही. पण त्यांची ग्रहदशाही काही गोष्टी सांगते. त्यांचे राशीफल काय आहे, वाचा -

ज्योतिष शास्त्रानुसार शनी, राहू आणि केतू हे राशीच्या कुठल्या स्थानात असतात, याला मोठे महत्त्व आहे. त्यांच्या स्थानावरून आणि बदलत्या स्थितीवरून आपल्या भविष्य़ाचा अंदाज लावता येतो. काही ज्योतिषांच्या मते, सावध राहणे हाच आपला तोटा टाळण्याचा मोठा उपाय आहे. त्यामुळे कर्क, वृश्चिक आणि सिंह राशीच्या लोकांना उद्याचा दिवस कसा असणार आहे, त्यांची ग्रहदशा काय असणार आहे, ते पाहणे विशेष औत्सुक्याचे आहे. 

कर्क : आर्थिक वृद्धी होईल. आपण मुळातच एक उत्तम सल्लागार आहात. विद्वान आहात व सात्विक वृत्ती आहे. तुम्हाला काही दिवसांपासून कामांत अडथळे व अपयश येत आहे. परंतु आता मात्र तसे होणार नाही. येत्या काळात आर्थिक वृद्धी होईल.

तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा

स्थावर इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्याचे प्रश्नही योग्य उपचारांनी सुटतील. तसेच बराचसा ओढा अध्यात्माकडे राहील. अचानक धनलाभाचेही योग आहेत. नोकरी/व्यवसायात वृद्धी होईल. नवीन कल्पना सुचतील. त्या अंमलात येतील व त्यात यशही मिळेल.

सिंह : तुम्ही धीरगंभीर, भावनाप्रधान, शिस्तप्रिय आहातच. लोकांचे आपल्याबद्दल प्रचंड गैरसमज निर्माण होतात, पण आपण त्यांची पर्वा करत नाही. त्यामुळे मानसिक क्लेशापासून दूर राहता. तरीही काही काळ आपल्याला कमालीचा एकांतवास जाणवेल.

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

त्यामुळे आपणच शांतता, संयम ठेवावा. जिभेवर पूर्णपणे नियंत्रण ठेवावे. लेखक असाल, तर एखादी सुंदर कलाकृती आपल्याकडून लिहिली जाईल. पती/पत्नीने एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे. कायदा मोडू नका. नाही तर अटक होण्याचे योग आहेत.

वृश्चिक : साडेसाती संपली असली, तरी आपल्या लग्नेशाचे व्ययस्थानातून भ्रमण होत आहे. त्यामुळे कोणतेही कारण नसताना आपणाकडून नुकसान होऊ शकते. वास्तविक आपल्याला हुशारी व धूर्तपणा हे गुण मुळातच मिळाले आहेत. त्यामुळे नुकसान होणार नाही. दक्षता घ्या.

लातूरला कधी होणार चिकन महोत्सव

नोकरी/व्यवसायात दीर्घकालीन एखादी अडचण उभी राहू शकते. आरोग्याची काळजी घ्या. डॉक्टरांना निदान होण्यास अडचणी निर्माण होतील. विवाह ठरविताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आपली फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jyotish Horoscope News Aurangabad