कायगाव पुलावर बसवला काकासाहेब शिंदे यांचा पुतळा

अतुल पाटील
मंगळवार, 23 जुलै 2019

मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या काकासाहेब शिंदे यांचा कायगाव पुलावर (ता. गंगापूर) सोमवारी (ता. 22) मध्यरात्री पुतळा बसविण्यात आला. काकासाहेब यांचा आज (ता. 23) पहिला स्मृती दिन आहे.

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या काकासाहेब शिंदे यांचा कायगाव पुलावर (ता. गंगापूर) सोमवारी (ता. 22) मध्यरात्री पुतळा बसविण्यात आला. काकासाहेब यांचा आज (ता. 23) पहिला स्मृती दिन आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी कानडगाव (ता. गंगापूर) येथील युवक काकासाहेब शिंदे यांनी इशारा देऊन 23 जुलै 2018ला दुपारी सव्वातीनच्या सुमारास कायगाव पुलावरुन गोदावरी नदीत उडी घेतली होती. आज या घटनेला एक वर्ष पुर्ण झाले.

काकासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवप्रेमींनी सोमवारी रात्रीच कायगाव पुलाच्या सुरवातीलाच चबुतरा उभारत काकासाहेब शिंदे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी हा पुतळा बसवला आहे. गेल्यावर्षीच्या घटनेनंतर कायगाव पुलाचे नामकरण 'हुतात्मा काकासाहेब शिंदे सेतू' असे करण्यात आले आहे. कायगाव पुलावर मराठा समाज बांधवांची गर्दी नसली तरी, तणावपूर्ण शांतता आहे.

क्युआरटी (दंगा काबू पथक) 3, वरुण वॉटर पॅनल 1, 
उपविभागीय पोलीस अधिकारी, 4 पोलीस निरीक्षक, 13 पोलीस उपनिरीक्षक, 240 कर्मचारी यांचा फौजफाटा आहे.
अग्निशमनचे वाहन, रबर बोट आणि अग्निशमनचे वाहन असून सोबत अधिकारी, कर्मचारी मिळून 15 जणांची टीम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kakasaheb shinde statue installed at Kaigaon bridge related to Maratha reservation