
कळमनुरी : विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?
कळमनुरी : शिवसेनेत पक्षांतर्गत मोठी उलथापालथ झाली. याचे परिणामी, कळमनुरी विधानसभा मतदारसंघातही दिसले. अगोदर ‘मातोश्री’च एकनिष्ठ राहणार असे सांगणारे आमदार संतोष बांगर हे ऐनवेळी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे आता येथील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात आहेत. ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशी त्यांची अवस्था झाली आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षांतर्गत सुरू असलेली उलथापालथीमुळे पक्षाचे जिल्हाभरातील कार्यकर्ते गोंधळून गेले आहेत.त्यातच पक्षनिष्ठा सांगणारे आमदार बांगर यांनी एकनाथ शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे पक्षांतर्गत कार्यकर्ते सैरभैर झाले असतानाच आपण आता नेमकी कोणती भूमिका घ्यावी, या संभ्रमावस्थेत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सापडले असल्याचे चित्र आहे. त्यातही या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये निर्माण होणारी संभाव्य संधी व पदाकरिता केली जाणारी दावेदारी हा सर्व हिशेब पाहता अनेकांनी आता मागे थांबणे पसंत केले असल्याचे चित्र आहे.
संपर्क प्रमुख ‘ॲक्टिव मोड’वर
आमदार यांनी शिंदे गटाची वाट धरली. त्यानंतर पक्षातील गळती थांबवण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख ॲक्टिव मोडवर आल्याचे चित्र आहे. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद वाढवला असून, बैठका, मेळावेही घेतले आहेत.
नेमके काय होणार?
संतोष बांगर यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पदही होते.
बांगर शिंदे गटात गेल्याने कार्यकारिणीची फेर निवड होणार.
येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार
या निवडणुकीत कुठल्या गटाकडून यश मिळेल, याची इच्छुकांकडून चाचपणी
अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तिकीट वाटपावेळीच परिस्थिती सष्ट होणार.
Web Title: Kalamanuri Shiv Sena Activists Sairabhaira Political Upheaval
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..