कळंब येथे बालकाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

कळंब - येथील कृष्णा गोरोबा इंगोले (वय 6) या बालकाची हत्या करण्यात आल्याची घटना पिंपळगाव (डोळा, ता. कळंब) येथे शुक्रवारी (ता. 27) उघडकीस आली. ही हत्या कोणी व कशासाठी केली, याचा पोलिस शोध घेत आहेत.

कळंब - येथील कृष्णा गोरोबा इंगोले (वय 6) या बालकाची हत्या करण्यात आल्याची घटना पिंपळगाव (डोळा, ता. कळंब) येथे शुक्रवारी (ता. 27) उघडकीस आली. ही हत्या कोणी व कशासाठी केली, याचा पोलिस शोध घेत आहेत.

शहरातील एका इंग्रजी माध्यम शाळेत पहिलीत असलेला पिंपळगाव (डोळा) येथील कृष्णा हा शाळेतील प्रजाकसत्ताक दिनाचा कार्यक्रम आटोपून गुरुवारी (ता. 26) सकाळी अकराच्या सुमारास घरी आला. त्याचे वडील गोरोबा इंगोले हे ऊसतोडीसाठी दोन महिन्यांपूर्वी कर्नाटकात गेले आहेत. पिंपळगाव पाटीजवळ शेतातील घरात इंगोले कुटुंबीय राहतात. आई धार्मिक कार्यासाठी बाहेर गेल्याने कृष्णाला आजीने जेवण दिले. त्यानंतर कृष्णा बाहेर गेला तो रात्री उशीरापर्यंत परतला नाही. त्यामुळे आई सारिका यांनी तो हरवल्याची फिर्याद पोलिसांत दिली. पोलिस त्याचा शोध घेत असताना घरापासून पाचशे फुटांवर कृष्णाचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्‍यावर घाव घालून त्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. श्‍वानपथकाने घटनास्थळापासून कळंब-ढोकी मार्गापर्यंत माग दाखविला. येथील ग्रामीण रुग्णालयात कृष्णाचे शवविच्छेदन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी केली.

Web Title: Kalamb child killed

टॅग्स