धक्कादायक..! या जिल्ह्यात झाली मोराची हत्या...वाचा वनविभागाने काय केले...!

mor death.jpg
mor death.jpg

कळंब (उस्मानाबाद) : तालुक्यातील बहुला शिवारात राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची अज्ञातांनी हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली. याबाबत वनविभागाचे अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून हत्या करणारा कोण याबाबत तपास करण्यात येत आहे. ही घटना शनिवारी (ता.२५) सायंकाळी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली आहे.

तालुक्यात झालेल्या चांगला पाऊसामुळे कळंब तालुक्यात निसर्गरम्य वातावरण पहावयास मिळत आहे. त्यामुळे मोर, हरण याच्यासह अन्य पक्षी वन्य जीवाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पक्षी, वन्य प्राण्यांची हत्या करून मटण खाणारे काही शौकीन आहेत. कुठे कोणत्या पक्षी, वन्यजीवाचे वास्तव्य आहे याचा शोध घेऊन हत्या करून मटण खाणारी मोठी टोळी तालुक्यात कार्यरत असल्याचा संशय वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान तालुक्यातील बहुला शिवारात मोठ्या प्रमाणात मोर तसेच हरण गेल्या महिन्यात पहावयास मिळत होते असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. मागच्या काही दिवसांपासून पक्षी, तसेच वन्यजीवाची हत्या करणारी टोळी कार्यरत झाल्याने आता पक्षी, वन्य प्राणी पहावयास मिळत नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे सचिन ढगे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हत्या करण्यात आलेल्या मोराची पहाणी करून कळंब येथील पशुवैधकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी घेऊन गेले. दरम्यान कळंबचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील, पोलीस कर्मचारी श्री. जाधव, गणेश वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

(edited by pratap awachar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com