'उरी' पुन्हा चित्रपटगृहात; मात्र आता फ्री!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

- युवकांमध्ये सैन्याप्रती, देशाप्रती कर्तव्याची आणि अभिमानाची भावना जागृत व्हावी म्हणून कारगिल विजयदिनी (ता. २६) राज्यातील सर्व चित्रपटगृहात ‘उरी : द सर्जिकल स्ट्रईक’ चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण होणार आहे.

- कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

लातूर : युवकांमध्ये सैन्याप्रती, देशाप्रती कर्तव्याची आणि अभिमानाची भावना जागृत व्हावी म्हणून कारगिल विजयदिनी (ता. २६) राज्यातील सर्व चित्रपटगृहात ‘उरी : द सर्जिकल स्ट्रईक’ चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण होणार आहे. कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

देशभरात २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत राज्यातील युवकांमध्ये सैन्याप्रति कर्तव्याची भावना विकसित व्हावी याकरीता राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यातील चित्रपटागृहात ‘उरी: द सर्जिकल स्ट्रईक’ दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

१८ ते २५ वर्षातील तरुणांसाठी सकाळी दहा वाजता या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण होणार आहे. राष्ट्र कर्तव्याची भावना तरुणाच्या मनी निर्माण करण्याचा उद्देश आहे. या चित्रपट वितरक, सिनेमागृह मालक, चित्रपट संघटनांनी देशप्रती असलेले हे कार्य मानून या निर्णयास सहमती दिली आहे, असे निलंगेकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे नियोजन प्रत्येक जिल्हातील जिल्हाधिकारींच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याचे यशस्वी आयोजन करण्याकरीता पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्हयातील सर्व चित्रपटगृह चालक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांची बैठक आयोजित करावी, अशा सूचनाही निलंगेकर यांनी बैठकीत दिल्या आहे. याबाबतचे परिपत्रक शासनाव्दारे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयास तातडीने पाठविण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on Kargil victory day free projection of uri film