राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे दुसऱ्यांदा भाजपमध्ये 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला गळती लागली असून, त्यांचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये जात आहेत. यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे औरंगाबाद माजी शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे यांची भर पडली आहे.

मंगळवारी (ता. 27) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांच्यासह कॉंग्रेसचे नारायणअण्णा सुरगोणीवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 
राज्यमंत्री अतुल सावे यांच्याह एका शिष्टमंडळाने 21 ऑगस्टला श्री. कोकाटे यांच्या घरी सदिच्छ भेट दिली होती. त्या भेटीत प्रवेश निश्‍चित करण्यात आला होता. आता कोकाटे यांच्यासह कॉंग्रसेचे पांडुरंग तायडे, विठ्ठल जाधव, विशाल सानप यांनी हाती कमळ घेतले. 
 
दुसऱ्यांदा प्रवेश 
वर्ष 2005 मध्ये श्री. कोकाटे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झाले होते; मात्र महापालिकेच्या निवडणुकीत सिडको एन-8च्या वॉर्डची जागा भाजपऐवजी शिवसेनेला गेल्यामुळे कोकाटे यांनी ती निवडणूक अपक्ष लढवित विजय मिळवला होता. त्यासाठी भाजपचा पाठिंबा घेतला होता; पण त्यानंतर 2009 विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. भागवत कराड यांच्या विरोधात त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. नंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर आता पुन्हा ते भाजपमध्ये गेले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com