कविसंमेलन रंगले ऑनलाइन, रसिक श्रोत्यांचीही मिळाली दाद 

kavi
kavi

हिंगोली ः ग्रामीण मुस्‍लिम मराठी साहित्य चळवळ व महाराष्ट्र राज्य आयोजित रविवारी (ता.२१) झालेल्या एकदिवसीय दुसऱ्या ऑनलाइन साहित्य संमेलनात व्याख्यान व कवी संमेलन अशा दोन सत्रात संमेलन घेण्यात आले. त्‍याला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

संमेलनाच्या अध्यक्षस्‍थानी कवी ॲड. हाशम पटेल (लातूर), तर उद्‍घाटक म्‍हणून प्रख्यात समिक्षक प्रा. डॉ. अक्रम पठाण (नागपूर) तर प्रमुख पाहुणे म्‍हणून कवी के. टी. काझी (औसा), ॲड. जमील देशपांडे (जळगाव), हबीब भंडारे (औरंगाबाद) यांची उपस्‍थिती होती. पहिल्या सत्रात प्रा. डॉ. अक्रम पठाण यांनी ‘मुस्‍लिम मराठी साहित्य पार्श्चभुमी’ या विषयावर विचार मांडले. मराठी मुसलमान या फेसबुक पेजवरून ते लाईव्ह दाखविण्यात आले.

हेही वाचा - अरे बापरे, नऊ हजार घरांवर रेड शिक्‍के

 
निमंत्रित कवींचे कवीसंमेलन 
दुसऱ्या सत्रात कवी ॲड. हाशम इस्‍माईल पटेल यांच्या अध्यतेखाली निमंत्रित कवींचे कवीसंमेलन उत्‍साहात पार पडले. त्‍यांनी त्‍यांच्या शालेय अभ्यासक्रमातील शांतीगीत ही कविता सादर केली. कवी के. टी. काझी यांनी ‘काजळ’ या कवितेतून ठारच मारायचंय मला तर तलवार नको, पाजळ सहित्य कोणा दुसऱ्यासाठी सजव, तु नयनात काजळ अशी परोपकार दाखविणारी कविता सादर केली. ॲड. जमील देशपांडे यांनी फादर डे निमित्त सादर केलेल्या कवितेला दाद मिळाली. त्‍यांनी बापाच्या खांद्यावर, अश्रू खुप गेली, बापाचा जनाजा होता खांद्यावर ही कविता सादर केली. कवी चॉंद तरोडकर यांनी खड्डा मनात मोठा, खोदून पाहतो, दुःखास त्‍यात आता लोटून पाहतो, स्‍वप्नात चॉंद माझ्या येईल काय ती, चल मग उगल आता झोपून पाहतो, ही कविता सादर केली. कवियत्री अनिसा शेख (पुणे) यांनी स्‍त्रीवादी कविता सादर केली. मी आजची नारी अबला नाही, कमजोर तर नाहीच नाही, आवाज उडवते अन्याया विरुध्द, वावड्या नजरांना सोडणार नाही. कवी वाय. के. शेख यांनी तुझ्याच लकबी, तुझ्यास सवयी, काळजात माझ्या बसली कवीता. कवी शब्‍बाना मुल्‍ला यांनी शेतकरी कविता सादर केले. माझ्या सोन्याचा संसार, जरी पोट शेतावर, घाम गळाते अंगाचा, रोज काळ या मातीवर , कवी अहमद पिरनसाहब यांनी बोलतो मराठी, लिहतो मराठी, ऐमतो मराठी, आवडीने हा संदेश दिला.

कवितेला मिळाल्या दाद
कवी हबीब भंडारे यांनी सुन्या माळावर दर्गा, नेटात ऊरुसामधी गजबजलेली दुआ मागताना नवसाची, वचन ओठात कुजबुजलेली ही तुरबतीला आले गहिरेपण ही कविता सादर केली. कवी दाम्‍पत्य जाकीर तांबोळी व सफुरा तांबोळी यांनीही यात सहभाग घेत कवियत्री सफुरा तांबोळी यांनी कोरोनाच्या काळात ओढ लागली. मला माहेरची, माझ्या आईच्या प्रेमळ कुरवाळायची, ओढ लागली मला माहेरची माझ्या बापाच्या वत्‍सक नजरेची तसेच कवी दिलशाद सय्यद अहमदनगरकर यांनी संत गाडगेबाबा यांच्यावरील अंभग सादर केला. गरीबाचे वाली, अनाथाचे साथी, खापरच माथी, सदोदित स्‍वच्‍छतेचा नारा, घरोघरी दिला, धावे सफाईला, अंगणातही सफाईच ही कविता सादर केली. या संमेलनात कवी जाकीर तांबोळी, जास्‍मीन शेख, बा. हा. मगदुल, ॲड. शेख इक्‍बाल रसुलसाब, अख्तर शेख, बी. एल. खान यांनीही कविता सादर केल्या. कवी खाजाभाई बागवान यांनी सूत्रसंचालन केले तर कवी शफी बोल्‍डेकर यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com