Video : कावडयात्रेत बम बम भोलेचा जयघोष

कावड यात्रा
कावड यात्रा

औरंगाबाद - शहराच्या मुख्य मार्गावरुन बम बम भोले, हर हर महादेवचा जयघोषण करत आणि खांद्यावर जलाने भरलेल्या कलशांची कावड घेउन निघालेल्या कावडीयांनी औरंगाबाद शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. शिवसेना व अन्य हिंदूत्ववादी संघटनांच्यावतीने हर्सुल येथील हरिसिद्धी माता मंदीर परिसरातील जलकुंडातील जल घेऊन आज (ता. 27) तब्बल 501 फूट लांबीची कावडयात्रा काढण्यात आली. या विश्‍वविक्रमी कावडयात्रेचे तिसरे वर्ष होते. 

कावड यात्रेचे मुख्य संयोजक आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सपत्नीक जलकुंडाचे पूजन करुन कलशात जल भरुन घेतले. कावड यात्रेत सुमारे साडे सहा फूट उंचीचे शिवलिंग आणि त्यावर होणारा जलाभिषेक या यात्रेत अग्रभागी रथामध्ये ठेवण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून ही कावड यात्रा काढण्यात येते. गेल्या वर्षी तब्बल 501 फूट लांबीच्या या कावड यात्रेची जागतिक विक्रमाची दखल घेणारी संस्था वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. 

विधानसभा अध्यक्ष हरिभाउ बागडे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, प्रदीप जैस्वाल , दयाराम बसैय्ये कावडयात्रेत सहभागी झाले. 
टीव्ही सेंटर, गणेश कॉलनी, चेलीपुरा, शहागंज गांधी पुतळा, सराफा बाजार, सिटी चौक, मछली खडक, गुलमंडी, औरंगपुरा, नागेश्वरवाडीमार्गे खडकेश्‍वर येथील महादेव मंदिरापाशी दाखल झाली. खडकेश्‍वर येथील महादेव मंदिरात जलाभिषेक करून पर्जन्यवृष्टीसाठी साकडे घालण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com