भाजपला सत्तेपासून  दूर ठेवा - आंबेडकर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

उस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून भाजप करीत आहे. आगामी निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

‘न खाऊँगा, न खाने दूँगा’ असे मोदी म्हणत होते. आता त्यांची भाषा बदलली असून, ‘खाऊँगा लेकिन, खाने नहीं दूँगा’, असे म्हणत ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून जनतेचा पैसा वसूल केला जात आहे, असे आंबेडकर म्हणाले. हे चोरांचे सरकार असल्याची टीका त्यांनी या वेळी केली.

काँग्रेससोबत जाण्यासाठी आम्ही तयार होतो. त्यासाठी काँग्रेसची दोन महिने वाट पाहिली. आम्ही ‘एमआयएम’सोबत गेलो तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या.
- ॲड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, भारिप-बहुजन महासंघ

Web Title: Keep BJP away from power says prakash ambedkar