मळणी यंत्र अंगावर पडून दोन महिलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

केज (जि. बीड) - तालुक्‍यातील सांगवी (सारणी) येथे सोयाबीनची मळणी सुरू असताना मळणी यंत्र अंगावर पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. चार) दुपारी सव्वाच्या सुमारास घडली. तारामती बबन गायकवाड (वय 45) व रतन यंका गायकवाड (वय 50) अशी मृतांची नावे आहेत.

सांगवी (सारणी) येथील छत्रभुज केदार यांच्या शेतातील खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर यंत्राद्वारे सोयाबीनची मळणी करण्यात येत होती. तारामती गायकवाड व रतन गायकवाड या सोयाबीनची मळणी करीत होत्या. या वेळी ट्रॅक्‍टरला जोडलेले व सुरू असलेले मळणी यंत्र अचानक पडले. तारामती व रतन गायकवाड यांच्या अंगावर वजनदार यंत्र पडल्याने त्या दबल्या गेल्या. जखमींना केज रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघींना तपासून मृत घोषित केले. पोलिस पंचनामा करून उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: kej beed news two women death by machine colapse