शेतकरी पती-पत्नीची बीड जिल्ह्यात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

केज (जि. बीड) - नापिकी, कर्जबाजारीपणामुळे उंदरी (ता. केज) येथील विक्रम गंगाराम ठोंबरे (वय 59) व जलसाबाई विक्रम ठोंबरे (वय 57) या शेतकरी दांपत्याने सोमवार पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली.
खरिपाच्या पिकाची चांगली वाढ होत असताना पावसाने दडी मारली.

शेतातील उभ्या पिकाचे काय होणार, यापूर्वी सतत चार वर्षांच्या नापिकीमुळे शेतीसाठी घेतलेले सोसायटी, बॅंकेचे कर्ज कसे फेडायचे, नातीचे लग्न कसे करायचे आदी अडचणींमुळे हे दांपत्य विवंचनेत होते. कुटुंबातील अन्य सदस्य झोपेत असतानाच या दोघांनी टोकाचे पाऊल उचलले. विक्रम ठोंबरे यांनी घरासमोरील झाडाला; तर जलसाबाई यांनी घरातच गळफास घेतला. या दोघांच्याही नावावर सोसायटीसह एका बॅंकेच्या धारूर शाखेचे कर्ज होते.

Web Title: kej marathwada news farmer couple suicide