
शेतातील शेततळ्यात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या तीन चिमुकल्यांचा पाण्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पैठण (सावळेश्वर) येथे घडली.
Kej News : शेततळ्यात बुडून तीन चिमुकल्यांच्या मृत्यू
केज - शेतातील शेततळ्यात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या तीन चिमुकल्यांचा पाण्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार (ता.२१) रोजी दुपारी पैठण (सावळेश्वर) येथे घडली. या घटनेत मृत्यू झालेले तिन्हीही चिमुकले पाच ते आठ वयोगटातील आहेत.
तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) शिवारातील शेततळ्यात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या स्वराज जयराम चौधरी (वय-०७ वर्ष), श्लोक गणेश चौधरी (वय-०७ वर्ष) व पार्थ श्रीराम चौधरी (वय-०८वर्ष) या तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
या घटनेची माहिती समजताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळास भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करून तीनही मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी युसुफवडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहेत.