अौरंगाबादेत अंत्यविधीलाही रॉकेल मिळणे दुरापास्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा त्रास मृत्यूनंतरही पाठ सोडायला तयार नाही. शहरात रॉकेलचा कोटा निम्म्याने कमी करण्यात आला. त्यामुळे शहरात अंत्यविधीसाठी रॉकेल मिळत नाही, या परिस्थितीने डिझेल किंवा टायरचा वापर करून अंत्यसंस्कार करण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

शहरामध्ये पुरवठा विभागाने आधार बेस रेशनकार्ड मोहीम हाती घेतली आहे. यामुळे आधार लिंक न झालेल्यांच्या रेशनचा कोटा कमी करण्यात येत आहे. 

सरकारी धोरणानुसार आता रॉकेलसाठी आधार कार्डला दिलेला अंगठा जुळला तरच रॉकेल मिळणार आहे. शहरात सप्टेंबरपर्यंत रॉकेलचा पुरवठा १,२७२ किलोलिटर होता; मात्र आधारबेस केल्याने शहराचा पुरवठा नोव्हेंबर महिन्यात ९९६ किलोलिटरवर आला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात सहज मिळणारे रॉकेल दुरापास्त झाले आहे.

शासनाच्या धोरणानुसार रेशनचा कोटा आधारबेस केला आहे. शहरात अंत्यसंस्कारासाठी रॉकेल मिळत नाही खरे आहे. यासाठी शासनाकडे मार्गदर्शन मागवावे लागेल किंवा महापालिकेनेही पुढाकार घेतला पाहिजे. 
- भारत कदम, पुरवठा अधिकारी

Web Title: kerosene not get for funeral in aurangabad