खरिपाचे पीककर्ज वाटप अंतिम टप्प्यात

प्रकाश बनकर
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

कर्ज वाटप प्रक्रीया जिल्ह्यात सुरु होती. आतपर्यंत 40.90 टक्‍के कर्ज वाटप करण्यात आले आहे. जुन्या कर्जांचे पुनर्गठण प्रक्रीया राबविण्यात आली. कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांनी या प्रक्रीयेत सहभाग घेतलाच नाही.

औरंगाबाद : खरीप आणि रब्बीसाठी जिल्ह्यात पीक कर्ज वाटप अंतिम टप्प्यात आले आहेत. एक ऑक्‍टोबरनंतर रब्बीसाठीचे कर्ज वाटप सुरु होते. जिल्ह्यात आतापर्यंत 77 हजार 995 शेतकऱ्यांना 553 कोटी 14 लाख 88 हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यात काही बॅंकांतर्फे शेतकऱ्यांना विविध अटी लावून कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. तर काही ठिकाणी कर्ज देण्यास बॅंक तयार आहे, मात्र शेतकरी कर्ज घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहेत. 

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मराठवाड्यात पडत असलेल्या सततच्या दुष्काळाचा परिणाम शेतीवर झाला. यामुळे यंदा मागेल त्यास कर्ज देण्यात यावेत अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. त्यानुसार कर्ज वाटप प्रक्रीया जिल्ह्यात सुरु होती. आतपर्यंत 40.90 टक्‍के कर्ज वाटप करण्यात आले आहे. जुन्या कर्जांचे पुनर्गठण प्रक्रीया राबविण्यात आली. कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांनी या प्रक्रीयेत सहभाग घेतलाच नाही. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे जनजागृतीचे कार्यक्रम प्रत्येक तालुक्‍यात घेतले. बॅंकांनी कार्यशाळा घेऊन आवाहन केले, तरीही शेतकऱ्यांनी कर्ज पुर्नरगठणासाठी असमर्थता दर्शवली. यामुळे ज्यांच्यावर पुर्वीचे कर्जे आहेत. त्यांना नव्याने कर्ज मिळाले नाही. आता खरींपाचे अंतिम टप्पा सुरु आहे. निवडणुकीचा काळ असल्यामूळे या काळात जुने कर्ज असलेले शेतकरी पुन्हा नवे कर्ज घेण्यासाठी बॅंकांच्या दारात येत आहे. 

 आठवड्यातून दोन वेळा बैठका 

पीक कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांतर्फे सातत्याने करण्यात येत आहे. त्या तक्रारी स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी सरकारतर्फे तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती नेमण्यात आली आहे. ही समिती प्रत्येक सोमवारी आणि प्रत्येक गुरुवारी अशा दोन बैठका घेण्यात येत आहेत. या समितीकडे जिल्ह्यात एकूण 4 हजार 720 तक्रारी अर्ज दाखल झाले. यापैकी 4 हजार 678 अर्ज निकाली काढण्यात आले. तर 42 अर्ज प्रलंबित आहे. 
 

बॅंक  शेतकरी संख्या कर्ज वाटप  टक्‍केवारी
जिल्हा बॅंक 41 हजार 611 127 कोटी 57 लाख 85 हजार 30.14 टक्‍के
व्यापारी बॅंका 26 हजार 689 346 कोटी 45 लाख 53 हजार 50.10 टक्‍के 
 
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक 9 हजार 686 78 कोटी 11 लाख 50 हजार 67.54 टक्‍के 
 
एकुण 77 हजार 995 553 कोटी 14 लाख 88 हजार  44.90 टक्‍के 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kharip Crop Loan Distribution In Last Stage