अपहृत व्यक्तीची कर्नाटकमधून सुटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

पाटोदा - पैशाच्या देवाण-घेवाणीवरून तालुक्‍यातील पाचंग्री येथील एकास मारहाण करून त्याचे अपहरण केल्याची घटना गुरुवारी (ता. 10) घडली होती. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मोबाईलच्या लोकेशनद्वारे आरोपीचा शोध घेतला व अपहृत व्यक्तीची कर्नाटकमधून सुटका करून तिघा जणांना ताब्यात घेतले. पाटोद्यातील सुनील बागल हे सध्या विश्रांतवाडी, पुणे येथे कामानिमित वास्तव्यास आहेत. गुरुवारी ते आपल्या गावी आले असता त्यांच्या घरासमोर सुरेश साळवे (रा. कोल्हापूर, ह. मु. विश्रांतवाडी, पुणे) व विजय पाटील यांच्यासह सहा ते सात जणांनी त्यांना मारहाण करून अपहरण केले. आरोपी आणि अपहृत कर्नाटकमधील निपाणी येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी बागल यांची सुटका केली.
Web Title: kidnapping release crime