किडणीच्या स्टोनने आख्खे गाव त्रस्त, क्षारयुक्त पाण्याचा प्रादुर्भाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

जरंडी (औरंगाबाद) - सोयगाव तालुक्यातील तिखी ता.सोयगाव या गावाला चार महिन्यापासून क्षारयुक्त पाणी मिळत आहे. हे पाणी सतत ग्रामस्थांच्या पिण्यात आल्याने या गावातील ग्रामस्थांना किडणी स्टोनच्या गंभीर आजाराने त्रस्तकेले आहे. दरम्यान, सोमवारी आख्या गावातील २५ जणांना पोटाचा विकार व स्टोनचा त्रास जाणवू लागल्याने पाचोरा जि.जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या पथकाने गावातील पाण्याच्या स्रोताचे पाच नमुने तपासणीसाठी घेतल्याची माहिती आरोग्य सूत्रांकडून हाती आली आहे.

कवली ग्राम पंचायतीच्या हद्दीतील तिखी हे अल्पसंख्यांक वस्तीचे टुमदार गाव आहे. या गावाला पाणी पुरवठ्याची नळ योजना कार्यान्वित आहे. परंतु, ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीतील पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असल्याने ग्रामस्थांना क्षारयुक्त पाणी पिण्यात येवून, यामुळे किडणीस्टोनचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे गावकरी चिंतेत आहेत.

पाणी पुरवठ्याच्या विहिरीत क्षाराचे वाढत्या प्रमाणाचे अद्याप कारण स्पष्ट झाले नसून, आरोग्य विभागाने विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. अल्पसंख्यांक वस्तीचे तिखी गाव आधीच आरोग्याच्या मुलभूत सेवेपासून वंचित आहे. या गावात शासनाच्या कोणत्याही विकास योजना अद्याप पोहचलेल्या नाही. डोंगरदऱ्यांच्या मध्यभागी वसलेल्या या गावाला वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाचा मोठा धोका निर्माण झाला असतांना वनविभागानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या जिल्हाभर चोरीच्या अफवांचे पेव फुटले असतांना, महावितरणचा वीजपुरवठाही या गावात सुरळीत राहत नसल्याने ग्रामस्थांच्या भीतीत वाढ झाली आहे. तालुका प्रशासनाचे या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांच्या विकासात भर देण्यासाठी लोकप्रतिनिधीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे. मजुरांच्या हातांना कामे नसल्याने या गावात रोजगार हमी योजनेच्या कामांना गती मिळाली नसल्याने मजुरांची मोठी उपासमार होत आहे.

गावात आरोग्य पथकाला पाठविण्यात आले आहे. स्टोन पेक्षा पोटाचे विकार जास्त प्रमाणात जडल्याचे आरोग्य पथकाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोटाच्या विकाराचे निदान व सर्वेक्षण करण्याच्या सुचना आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहे. जास्त त्रास जाणवत असलेल्या रुग्णांना पाचोरा जि.जळगावला उपचारासाठी जाण्याचा सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे.                       
- डॉ.श्रीनिवास सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी सोयगाव 

तिखी गावाच्या घटनेची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे. याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याने स्थिती चिंताजनक नाही. परंतु, काही रुग्णांना पोटाचे विकार मोठ्या प्रमाणावर आहे. यासाठी औषध साठा संकलन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात येवून आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे.
- प्रकाश दाभाडे, प्रभारी गटविकास अधिकारी सोयगाव 

Web Title: Kidney Stone afflicted the whole village