औरंगाबादेत ट्रकच्या धडकेत महिला ठार; बीड बायपास रस्त्यावरील घटना 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, लता श्रीरंग लोलेवार (वय 48, प्लॉट क्रमांक 74, नारायणनगर सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे. बीडबायपास रस्त्यावरुन जाताना संग्रामनगर चौकातून बाजूने वळण घेताना महानुभाव चौकाकडे जाणाऱ्या ट्रकखाली त्या आल्या व चिरडल्या.

औरंगाबाद : चौकातून वळण घेताना ट्रकखाली चिरडून दूचाकीस्वार महिला ठार झाली. बीड बायपास रस्त्यावरील संग्रामनगर चौकात गुरुवारी (ता. 23) सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, लता श्रीरंग लोलेवार (वय 48, प्लॉट क्रमांक 74, नारायणनगर सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे. बीडबायपास रस्त्यावरुन जाताना संग्रामनगर चौकातून बाजूने वळण घेताना महानुभाव चौकाकडे जाणाऱ्या ट्रकखाली त्या आल्या व चिरडल्या. या घटनेनंतर त्यांना लगेचच याच भागातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतू, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची सातारा पोलिस ठाण्यात नोंद झाली. 

Web Title: Killed a women in truck crash in Aurangabad