किनवटचा ‘वनपाल’ लाचेच्या जाळ्यात 

file photo
file photo

नांदेड : अस्वलाच्या हल्ल्यात जखमी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी अहवाल सादर करिन मंजुरी मिळवून देतो. यासाठी अडीच हजाराची लाच स्विकारणारा किनवट येथील वनपाल लाचेच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई शुक्रवारी (ता. १५) रात्री किनवट येथे करण्यात आली.

किनवट तालुक्यात एका शेतकऱ्यावर अस्वलाने प्राणघातक हल्ला केला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. जखमीला शासकिय मदत मिळावी म्हणून सर्व कागदपत्रांसह किनवट येथील वनविभागात त्याच्या पुतन्याने फाईल दाखल केली. परंतु ही फाईल मंजुरीसाठी पाठविण्यासाठी जखमीच्या पुतन्यास तीन हजाराची लाच वनपाल बालाजी लक्ष्मण वच्छेवार (वय ५६) रा. पवार कॉलनी, भोकर याने मागितली.

तडजोडअंती अडीच हजार स्विकारले

तडजोडअंती ही लाच अडीच हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुरूवारी (ता. १४) नोव्हेंबर रोजी तक्रार दिली. या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी सापळा लावला. यात अडीच हजार रुपये घेण्याचे निष्पन्न झाले. यावरून शुक्रवारी (ता. १५) किनवट वनविभागाच्या कार्यालय परिसरात सापळा लावला. सायंकाळी सातच्या सुमारास बालाजी वच्छेवार हा अडीच हजाराची लाच घेतांना रंगेहात जाळ्यात अडकला.

सापळा यांनी केला यशस्वी

हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस अधिक्षक श्रीमती बावकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अर्चना पाटील आणि पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. एल. नितनवरे, कर्मचारी हनमंत बोरकर, अमरजीतसिंग चौधरी, अंकुश गाडेकर, अनिल कदम यांनी परिश्रम घेतले. पोलिस निरीक्षक श्री. नितनवरे यांच्या फिर्यादीवरुन किनवट पोलिस ठाण्यात लाचखोर वच्छेवार याच्याविरूध्द रात्री उशिरा लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच उशिरा त्याला नांदेडच्या एसीबी कार्यालयात स्थानबद्ध केले. शनिवारी (ता. १६) दुपारी श्री. वच्छेवार याला नांदेड न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांनी सांगितले. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन

नुकताच एसीबी विभागाचा दक्षता पंधरवडा संपन्न झाला. या पंधरवड्यात या विभागाने लाच घेणे व देणे हा गुन्हा असल्याची जनजागृती केली होती. परंतु कुठलेली शासकिय किंवा निमशासकिय काम लाच घेतल्याशिवाय होत नाही. सापळ्यांवर सापळे पडत असतांना कर्मचारी काही सुधरायला तयार नाही. असे कर्मचारी किंवा अधिकारी लाच मागत असतील तर थेट मला किंवा लाचलिचपत प्रतिबंधक विभागात येऊन तक्रार द्यावी असे आवाहन पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com