कीर्तन महोत्सवात ५०१ कन्यारत्नांचे नामकरण

बीड - शहरातील गौतम खटोड कीर्तन महोत्सवात ५०१ कन्यारत्नांचा झालेला नामकरण सोहळा.
बीड - शहरातील गौतम खटोड कीर्तन महोत्सवात ५०१ कन्यारत्नांचा झालेला नामकरण सोहळा.

बीड - शहरातील खटोड प्रतिष्ठानतर्फे आयोजित कीर्तन महोत्सवात रविवारी (ता. सहा) ५०१ कन्यांचा सामुदायिक नामकरण सोहळा झाला. गेल्या वर्षी याच ठिकाणी ३०१ मुलींचा नामकरण सोहळा एकाच मांडवाखाली झाला होता. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना आनंद देणे हे सर्वात मोठे सामाजिक कार्य असते. ते कार्य स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानने केले आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले. 

जिल्हा रुग्णालय प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाच्या पुढाकारातून रविवारी मुलींच्या नामकरणाचा सोहळा पार पडला. व्यासपीठावर खासदार डॉ. प्रीतम मुंडे, गोवत्स राधाकृष्ण महाराज, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, बिंगी नरेंद्र गौड, डॉ. स्वर्णश्री गुराम, डॉ. माने, रमेश पोकळे, आदित्य सारडा, स्वप्नील गलधर, सलीम जहाँगीर यांची उपस्थिती होती. 

प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सुशील खटोड, संयोजक भरतबुवा रामदासी, शुभम खटोड, आशिष खटोड, सिद्धार्थ मुनोत, प्रज्ञा रामदासी, अनिता खटोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राधाकृष्ण महाराजांनी सोहळ्याला आशीर्वाद दिले. 

खासदार मुंडे यांच्या हस्ते सामुदायिक नामकरण सोहळ्याची ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याबाबतचे प्रमाणपत्र गौतम खटोड यांना देण्यात आले.

मुली मोठ्या पदांवर जावोत...
प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड म्हणाले, मुलगी वाचवा - मुलगी शिकवा या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत हा उपक्रम दुसऱ्यांदा राबवला जात आहे. या मुली मोठ्या होऊन चांगल्या अधिकारी होतील, मोठ्या पदांवर जातील. या उपक्रमाचे सर्व श्रेय डॉ. अशोक थोरात यांना आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com